Homeपब्लिक फिगरराजकारणात फुलस्टॉप नसतो!...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील “राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!” हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील समर्पण, अनुभव आणि योगदानाचे मोल विशद केले.

पंतप्रधान मोदी यांनी निवृत्त खासदारांना सांगितले की, राज्यसभेतून बाहेर पडणे म्हणजे राजकीय प्रवासाचा अंत नाही. देशसेवेची उर्मी आणि अनुभवाची शिदोरी घेऊन हे नेते समाजात नव्या रूपाने कार्यरत राहू शकतात. त्यांनी या खासदारांच्या कार्यकाळातील योगदानाचे कौतुक करताना राज्यसभेला “लोकशाहीचे परिपक्व व्यासपीठ” असे गौरवोद्गार काढले.

राजकारण

मोदी यांनी राजकीय जीवनातील चढउतारांवर भाष्य करताना सांगितले की, प्रत्येक टप्पा हा नव्या संधीची सुरुवात असतो. दीर्घ संसदीय अनुभव ही देशाची अमूल्य संपत्ती असून निवृत्त खासदारांनी आपले ज्ञान व अनुभव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सभागृहातील या भाषणाने उपस्थित सर्वपक्षीय सदस्यांवर त्यांनी प्रभाव पाडला.

विविध पक्षांचे अनेक ज्येष्ठ खासदार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यावेळच्या पंतप्रधानांच्या “बीटवीन दी लाईन्स” वक्तव्याने राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. “फुलस्टॉप नसतो” हे त्यांचे शब्द केवळ निवृत्त खासदारांसाठीच नव्हे, तर देशातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणेचा स्रोत ठरले आहेत.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content