Homeचिट चॅटनागपुरात आठवडाभर आहे...

नागपुरात आठवडाभर आहे राज्यस्तरीय खादी प्रदर्शन!

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंदाव्दारे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या (केव्हीआयसी) सहयोगाने कालपासून नागपूरच्या सिवील लाइन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनीचे उद्घाटन काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी त्यांनी विविध खादी उत्पादनाच्या स्टॉल्सना भेट दिली आणि उत्पादक-विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी केव्हीआयसी नागपूर विभागाचे संचालक राघवेंद्र महिंद्रकर उपस्थित होते.

‘वोकल फॉर लोकल’ या अंतर्गत खादीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण भारतभरातून विविध खादी उत्पादनांचे स्टॉल या प्रदर्शनीदरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत पदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध राहतील. या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन केव्हीआयसी नागपूर विभागाव्दारे करण्यात आले आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content