Homeएनसर्कल.. तर डॉक्टरांना...

.. तर डॉक्टरांना गुन्हेगार मानले जाणार नाही!

कोणताही डॉक्टर रुग्णावर उपचार करताना त्याच्या मनात गुन्हेगारी हेतू नसतोच, या दृष्टिकोनाचा आयएमए नेहमीच पुरस्कार करित आलेली आहे. जोपर्यंत हानी पोहोचवण्याचा उद्देशच नसेल तोपर्यंत, वैद्यकीय अपघात किंवा अगदी निष्काळजीपणादेखील गुन्ह्याच्या मापदंडांना कसा पात्र होईल? जर वैद्यकीय व्यवसाय, अपघात किंवा निष्काळजीपणा या गुन्हयाच्या व्याख्येत बसत नसेल तर डॉक्टरांवर फौजदारी खटला चालवणे म्हणजे अतार्किक कारवाई होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले की, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास तो खून मानला जात असे आणि त्यांना शिक्षा केली जात असे. आम्ही एक दुरुस्ती आणणार आहोत, ज्यात डॉक्टरांना यातून मुक्तता किंवा सूट देण्यात येणार आहे, त्यासाठी इंडिअन मेडिकल असोसिएशननै (आयएमए) विनंती केली होती, अशी माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी दिली.

एकोणिसाव्या शतकातील वसाहतवादी कायद्याने होणारा अन्याय केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेमध्ये गुन्हेगारीच्या सीमा नव्याने परिभाषित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भारतीय संसद या शतकानुशतके जुन्या अन्यायातून मुक्ती देणारा इतिहास घडवू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लॉर्ड डेनिंग यांनी म्हटल्याप्रमाणे या कायद्याने देशातील डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या डोक्यावर सतत कारवाईची टांगती तलवार असल्याच्या दडपणाखाली रुग्णावर उपचार करतील ते दडपण आता दूर होण्याच्या मार्गावर आहे, असेही ते म्हणाले.

डॉक्टर

या देशातील डॉक्टरांच्या दुर्दशेविषयी त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. किंबहुना, वैद्यकीय समाजाला वसाहतवादी कायद्याच्या जाचक साखळीतून मुक्त झाल्यासारखे वाटेल. या निर्णयाचे परिणाम दूरगामी आणि रुग्णाच्या हितासाठी असतील. डॉक्टर पुन्हा एकदा गंभीर क्षणी, सर्वशक्तीनिशी, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धोका पत्करण्यास मोकळे होतील. वैद्यकीय व्यावसायिक सहेतुक हानी पोहोचवण्याच्या विरोधातच काम करतात आणि जगभरातील त्यामुळेच गुन्हेगारी दायित्व नसण्याचा समर्थनार्थ असतील या ऐतिहासिक निर्णयाचा परिणाम सीमांच्या पलीकडे जाईल आणि डॉक्टरांना गुन्हेगार म्हणून वागवण्याची पद्धत बदलेल, असेही त्यांनी सांगितले.

आयएमएने गेल्या काही वर्षात घेतलेल्या तत्वनिष्ठ भूमिकेला न्याय मिळाला आहे. आयएमए देशाच्या सेवेसाठी नेहमीच कटिबध्द आहे. कोविडची लढाई आयएमए आणि भारतातील वैद्यकीय समुदायाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढली. भारत सरकारने मंजूर केलेल्या आणि भारतात उत्पादित केलेल्या कोविड लसींनी भारतातील साथीच्या रोगाचा प्रसार थोपवला. तद्वतच एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी आयएमए भारत सरकारसोबत कायमच होती, आहे आणि असेल, असे उद्गार डॉ. दिनेश ठाकरे यांनी काढले. त्यावेळी उपाध्यक्ष डॉ. अनिल आव्हाडदेखील उपस्थित होते. भारतातील वैद्यकीय व्यवसायासाठी होऊ घातलेल्या क्रांतिकारी बदलाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आयएमए महाराष्ट्र राज्याचे सचीव डॉ. सौरभ संजानवाला यांनी आभार मानले आहेत.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content