Monday, February 24, 2025
Homeकल्चर +कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा...

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!

‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, शिवराज वायचळने. सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय ‘झी स्टुडिओज’ ही संस्था पुढे आली असून त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत. या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच “श्रीकांत”फेम तुषार हिरानंदानी या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत.

सोमवारी, १६ डिसेंबरला ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचा मुंबई महानगर पालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी, किरण दिघावकर महापालिका उपायुक्त, झी स्टुडिओजचे चिफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवेलकर, निर्माते निधी परमार – हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या खास मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहूर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रिकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल.

Continue reading

‘राणीची बाग’ राहणार बुधवारी खुली

‘महाशिवरात्री’निमित्त येत्या बुधवारी, २६ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नित्यनेमाने दर बुधवारी बंद राहणारे मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वाश्रमीची राणीची बाग) जनतेकरिता खुले राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी, २७ फेब्रुवारीला हे उद्यान बंद असेल,...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10 मार्चला!

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत येत्या सोमवारी 3 मार्चला सुरू होत असून ते बुधवार, 26 मार्चपर्यंत चालेल. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात शनिवारी, 8 मार्चला सार्वजनिक सुटीच्या दिवशीही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर...

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या दौऱ्यावर

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (सीओएएस) काल 24 ते 27 फेब्रुवारीदरम्यानच्या  फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.   आज सीओएएस पॅरिसमधील लेझ इनव्हॅलिड्स...
Skip to content