Homeमुंबई स्पेशलमुंबईत २२७ जागांसाठी...

मुंबईत २२७ जागांसाठी १७०० उमेदवार!

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेत काल शुक्रवारी एकूण ४५३ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍यात आली त्यामुळे आता मुंबईतल्या २२७ प्रभागांसाठी १ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक चिन्‍हाचे वाटप करण्यात आले. आजच या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले. नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत म्‍हणजेच ३० डिसेंबरपर्यंत एकूण २ हजार ५१६ उमेदवारीअर्ज दाखल झाले. ३१ डिसेंबरला या अर्जांची छाननी करण्‍यात आली. त्यात १६७ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. उमेदवारीअर्ज मागे घेण्याची मुदत काल शुक्रवारी संपली. या कालावधीत ४५३ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍यात आली. माघारीअंती स्‍पष्‍ट झालेल्‍या चित्रानुसार, १ हजार ७०० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

मुंबई

निवडणूक निर्णय कार्यालय / माघार घेतलेल्‍या नामनिर्देशन पत्रांची संख्‍या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्‍या याची माहिती पुढीलप्रमाणे-

१) ए + बी + ई विभाग (RO २३) – १९ / ९२

२) सी + डी विभाग (RO २२) – ०५ / ४४

3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) – २१ / ५०

४) जी दक्षिण विभाग (RO २०) – १४ / ५१

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) – १८ / १०९

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) – २५ / ९३

७) एल विभाग (RO १७) – २० / ७६

८) एल विभाग (RO १६) – २४ / ७४

९) एम पूर्व विभाग (RO १५) – ४१ / १२१

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) – ४४ / ९७

११) एन विभाग (RO १३) – ३४ / ८८

१२) एस विभाग (RO १२) – १५ / ७०

१३) टी विभाग (RO ११) – २४ / ७९

१४) एच पूर्व विभाग (RO १०) – २५/ ८७

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) – १२ / ५८

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) – १८ / ८२

१७) के पश्चिम विभाग (RO ७) – १८ / १०४

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) – १४ / ५६

१९) पी पूर्व विभाग (RO ५) – २१ / ८१

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) – ११ / ६०

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) – १० / ८३

२२) आर मध्‍य विभाग (RO २) – ०७ / ३५

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) – १३ / ३९

एकूण – ४५३/ १७००

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content