Homeएनसर्कलदिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभेनी...

दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभेनी दिले असाधारण प्रतिभेचे दर्शन

गुजरातमधल्या अहमदाबाद येथील संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सक्षमीकरण विभागाने अहमदाबादमधील प्रसिद्ध श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहामध्ये ‘दिव्य कला शक्ती’ हा नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच सादर केला.

केंद्रीय प्रादेशिक केंद्राने आयोजित केलेल्या या अनोख्या प्रदर्शनात दिव्यांग व्यक्तींच्या अव्यक्त प्रतिभेवर प्रकाश टाकण्यात आला आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सर्जनशील जगाचे दर्शन घडवण्यात आले. या कार्यक्रमात गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव येथील सहभागी झालेल्या एकूण 100 दिव्यांग व्यक्तींनी मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणात महत्वाची भूमिका बजावली.

समूह नृत्यांपासून ते चित्तवेधक एकल सादरीकरणांपर्यंत, मधुर सामूहिक गाण्यांपासून ते मंत्रमुग्ध करणारी एकल सादरीकरणे आणि विस्मयकारक विशेष कला प्रदर्शन असलेला, ‘दिव्य कला शक्ती’ हा कार्यक्रम सहभागींच्या उल्लेखनीय क्षमतेचा पुरावा होता. केन्द्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण  राज्यमंत्री ए. नारायणसामी आणि अहमदाबादचे माजी खासदार हसमुख भाई सोमाभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित होते.

या सायंकाळचे ठळक वैशिष्ट्य ठरला तो सत्कार समारंभ. यावेळी सहभागींना त्यांच्या असामान्य प्रतिभेसाठी कौतुक म्हणून एकूण 3,00,000 रुपयांचे धनादेश देण्यात आले. केवळ त्यांच्या कलात्मक कर्तृत्वाची दखलच घेतली नाही तर विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. ‘दिव्य कला शक्ती’ हा प्रेरणा देणारा, अडथळे दूर करणारा आणि प्रत्येक व्यक्तीतील अमर्याद क्षमता दाखवणारा दीपस्तंभ आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाने केवळ मनोरंजनच केले नाही तर प्रेक्षकांची मनेही समृद्ध केली. यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रतिभांबद्दलची सखोल समज आणि त्यांच्या बद्दलचे कौतुक अपार वाढले.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content