Homeपब्लिक फिगरपिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची...

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची जबाबदारी सध्या विलास लांडेंकडेच

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष यांनी काल आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज थेट पिंपरी-चिंचवडचे सर्किट हाऊस गाठले. तेथे त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली आणि पिपरी चिंचवडमध्ये पक्षांतर्गत सुरू झालेली पडझड थोपवण्याची जबाबदारी सध्यातरी माजी आमदार विलास लांडे यांच्यावर सोपवली असल्याचे कळते.

काल शरद पवार यांच्या उपस्थितीत अजय गव्हाणे यांच्याबरोबर पिंपरी परिसरातले जवळजवळ २० माजी नगरसेवकही त्यांच्या पक्षात दाखल झाले. त्यामुळे विधानसभेची ही जागा आता गव्हाणे लढवणार असल्याची चिन्हे दिसू लागली. पर्यायाने येथून इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. विधानसभेत पवार गटाला मतदान करायचे की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी हे कार्यकर्ते आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळेच काल खासदार अमोल कोल्हे यांनी आपला जनता दरबार पुढे ढकलला होता.

बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विट केले. गेल्या अनेक दशकांपासून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड  शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी, लोकप्रतिनिधी, पार्टी पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत,  त्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल, असा विश्वास पवार यांनी या ट्विटद्वारे केला.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content