Homeन्यूज अँड व्ह्यूजरोजच्या प्रदूषणावर 'बांबू...

रोजच्या प्रदूषणावर ‘बांबू लावणे’ हाच उपाय! 

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बांबू लागवड यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला तर कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्तर नसेल.. पण तरीही राज्यात बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जाणार आहे.

अजित पवार यांनी ही घोषणा शुक्रवारी त्यांच्या ६३ मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आणि दहा हजार हेक्टर (पंचवीस हजार एकर) खासगी क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे, हेही जाहीर केले. या योजनेअंतर्गत बांबूच्या एका रोपापोटी बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला १७५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. सुरुवातीला नंदूरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे.

बांबू

अजित पवार यांनी ही घोषणा केली खरी पण त्यातील बांबूच्या उल्लेखानंतर सभागृहात हंशा उसळला. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघत खुणेनेच त्यांना इशारा केला की बघा, अर्थमंत्री काय सांगताहेत.. त्यावर खुणेनेच मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले की हे जे काही आहे, ते तुमच्यासाठीच आहे.. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला आणि अजित पवार मात्र गंभीरपणे त्यांचे लेखी भाषण वाचत बांबू लागवडीच्या प्रोत्साहनाचा प्लान वाचत होते.

अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेतही बांबू लागवडीचा विषय चर्चिला गेला. शिवसेनेचे संजय राऊत यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी त्यांच्यावर टीका केली. बांबू लागवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की, रोज सकाळी सकाळी महाराष्ट्रात प्रदूषण सुरू होते.. म्हणजे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणही सुरू होते. बांबू इतर वनस्पतींपेक्षा २० टक्के जास्त प्राणवायू सोडतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो. त्यामुळे या रोजच्या प्रदूषणावर बांबूमुळे उपाय होऊ शकेल.

बांबू

संजय राऊत यांच्या सर्व टिव्हीवाल्यांना बाईट देत सुरू होणाऱ्या दिवसाचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन प्रदूषण या शब्दाला होता. त्यामुळे पत्रकार परिषदेतही पुन्हा एकच हंशा उसळला.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content