Thursday, November 7, 2024
Homeडेली पल्समागच्या तिमाहीत परवडणाऱ्या...

मागच्या तिमाहीत परवडणाऱ्या घरांची संख्या घटली!

एप्रिल-जून या तिमाहीत देशभरातील महत्त्वाच्या हाऊसिंग बाजारपेठांमध्ये एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या संख्येत लॉन्च आणि विक्रीबाबत उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमकडे उपलब्ध असलेला डेटामधून स्पष्ट झाले आहे. मात्र या काळात सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे कमी प्रमाणात लॉन्च झाली आणि त्यांची विक्रीही..

आरईए इंडियाच्या मालकीच्या या ऑनलाईन प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्मच्या ‘रियल इनसाइट: रेसिडेन्शियल एप्रिल-जून २०२४’ नामक तिमाही अहवालानुसार, या तीन महिन्यांदरम्यान भारतातील आठ मोठ्या रेसिडेन्शियल मार्केट्समध्ये नवीन लॉन्च झालेल्या घरांपैकी ४३% घरे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची होती. शिवाय, तिमाही विक्रीमध्ये या श्रेणीतील घरांचे प्रमाण ३८% आहे.

या अहवालात अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-एनसीआर (गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद), एमएमआर (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) आणि पुणे या निवासी बाजारपेठांचा समावेश करण्यात आला आहे. उपलब्ध डेटानुसार, ३० जून रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत एकूण १०१,६७७ घरे लॉन्च करण्यात आली, जी या आधीच्या तिमाहित लॉन्च झालेल्या १०३,०२० घरांच्या तुलनेत एका टक्क्याने कमी आहेत. दुसरीकडे मार्चमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत १२०,६४२ घरांची विक्री झाली होती, तर २०२४च्या दुसऱ्या तिमाहीत ११३,७६८ घरांची विक्री झाल्याचे आढळून आले.

तिमाही

प्रॉपटायगर डॉटकॉमचे बिझनेस हेड आणि आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ विकास वधावन म्हणाले की, गेल्या काही तिमाहींमध्ये किफायतशीर घरांची विक्री तसेच लॉन्च यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अधिक चांगल्या सुखसुविधा प्रदान करणाऱ्या मोठ्या घरांची मागणी वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये बांधकामाचा वाढता खर्च आणि जमिनींच्या किंमती यामुळे ४५ लाख रु.च्या आतील किंमतीची घरे (किफायतशीर) बनवणे विकासकांसाठी कठीण होऊन बसले आहे. परिणामी, या सेगमेन्टमध्ये खूप कमी घरे लॉन्च झाली आहेत. दुसरीकडे, मालमत्तेच्या वाढत्या किंमतीचा मागणीवर विपरीत परिणाम होईल, ही शक्यतादेखील दुर्लक्षिता येणार नाही. अधिक किंमतीच्या घरांची मागणी जगात सर्वात वेगाने विकसित होत चाललेल्या देशातील उत्पन्नाची वाढती पातळी दर्शविते. पण त्याचवेळी, किफायतशीर घरांची मागणी कमी होणे ही भारतासारख्या जगातील सर्वाधिक लोकवस्तीच्या देशासाठी एक चिंतेची बाब आहे.

नवीन पुरवठ्यातील केवळ १५% घरे ४५ लाख रु.पर्यंतच्या किंमतीची होती, जो सरकारने देशातील किफायतशीर घरांसाठीचा मापदंड ठरवला आहे. अहवालात असे दिसून येते की २५%वर, ही टक्केवारी त्रिमसिक विक्रीच्या बाबतीत तुलनेत जास्त होती. परंतु, वधावन यांचे असे मत आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला सादर केलेल्या केंद्रीय बजेट २०२४मध्ये ज्या मुख्य उपाययोजना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे किफायतशीर घरांचे प्रमाण वाढेल.

तिमाही

२०२४च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान लॉन्च आणि विक्रीची विभागवारी:

लॉन्च – किंमतीनुसार विभाजन
 Q2 23Q3 23Q4 23Q1 24Q2 24
< INR 25 लाख6%4%6%8%6%
INR 25-45 लाख18%15%13%13%9%
INR 45-75 लाख33%26%22%23%26%
INR 75-100 लाख14%11%10%20%16%
> INR 1 कोटी29%44%50%36%43%
लॉन्च झालेल्या घरांची एकूण संख्या113,774123,080132,423103,020101,677
विक्री – किंमतीनुसार विभाजन
 Q2 23Q3 23Q4 23Q1 24Q2 24
< INR 25 लाख13%11%11%5%9%
INR 25-45 लाख22%20%17%17%16%
INR 45-75 लाख27%24%25%26%24%
INR 75-100 लाख13%14%13%15%14%
> INR 1 कोटी25%31%34%37%38%
विक्री झालेल्या घरांची एकूण संख्या80,245101,221143,482120,642113,768

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content