Homeन्यूज अँड व्ह्यूजसशस्त्र दलातील महिलांना...

सशस्त्र दलातील महिलांना मिळणार ‘मातृत्वा’ची रजा!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलातील महिला सैनिक, खलाशी आणि वायुदलात कार्यरत महिला योद्ध्यांसाठी मातृत्व, बाल संगोपन आणि बालक दत्तक रजेचे नियम, त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. नियम अंमलात आल्यावर सैन्यदलातील सर्व, म्हणजेच अधिकारी किंवा इतर कोणत्याही पदावरील महिलांना या रजा समान प्रमाणात लागू होतील.

सशस्त्र दलांमध्ये कोणत्याही पदावर कार्यरत सर्व महिलांच्या समावेशक सहभागाच्या संरक्षण मंत्र्यांच्या संकल्पनेला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. रजेच्या नियमांमधील विस्तार सशस्त्र दलांमध्ये कार्यरत महिलांशी संबंधित कौटुंबिक आणि सामाजिक समस्या हाताळण्यासाठी दीर्घकालीन उपाय ठरेल. या उपायामुळे लष्करातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होणार आहे. त्यांना व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाच्या क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने संतुलन राखण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.

नारी शक्तीचा सदुपयोग करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वचनबद्धता अधोरेखित करत, तिन्ही सशस्त्र दलांनी महिलांना सैनिक, खलाशी आणि वायुदल योद्धा म्हणून समाविष्ट करत आदर्शवत परिवर्तन घडवून आणले आहे. महिला अग्निवीरांच्या भरतीमुळे देशाच्या भूमी, सागरी आणि हवाई सीमांचे रक्षण करण्यासाठी महिला सैनिक, खलाशी आणि वायुदल योद्धा यांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीने सशस्त्र दले अधिक सक्षम होतील.

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये कार्यरत असण्यापासून ते युद्धनौकांवर तैनात होणे तसेच अवकाशावर अधिराज्य गाजवण्यापर्यंत सशस्त्र दलातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील अडथळ्यांवर भारतीय महिला आता मात करत आहेत. वर्ष 2019 मध्ये, भारतीय सैन्यातील लष्करी पोलिसांच्या तुकडीत महिलांची सैनिक म्हणून भरती करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला होता. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने कार्यरत रहावे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नेहमीच मानत आले आहेत.

Continue reading

आज दुपारी 12 वाजता साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

आज श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा...

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....
Skip to content