Saturday, July 13, 2024
Homeपब्लिक फिगर'राष्ट्रवादी'चा दिमाखदार आणि...

‘राष्ट्रवादी’चा दिमाखदार आणि देखणा ‘स्वराज्य सप्ताह’ सुरू..

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु, शिक्षक किंवा मार्गदर्शक अशी सगळी भूमिका पार पाडली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी काल केला.

ज्या जिजाऊंनी जन्माला घातले… त्यांना वाढवलं… त्यांच्यावर संस्कार केले…. चांगले सल्ले दिले… त्यांना घडवण्याचे काम जिजाऊंनी केले ही बाब ध्यानात घ्या… असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान… अस्मिता… लढाऊ बाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आपले अभिमान आणि स्वाभिमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करुन स्वतःचे आरमार… जलदूर्ग उभारले. त्यांच्या कार्यप्रेरणेतूनच गेली चार दशके महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या पराक्रमाची पताका सर्वदूर फडकत असताना आपण पाहात आहोत. छत्रपतींनी महाराष्ट्रातील दुर्गम डोंगरदऱ्या, कडेकपारीमध्ये अठरापगड जातीला… मावळ्यांना… बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांच्यात स्वराज्य निर्मितीची चेतना जागवून खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. आपल्याला महाराजांच्या विचारांवर वाटचाल करायची आहे असे मार्गदर्शनही अजित पवार यांनी केले.

स्वराज्य

सर्वांचा आदर करायला शिकवणारा राजा अशी महाराजांची ओळख आहे. अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले… स्वाभिमानाने जगायला शिकवले… काळ्या आईची सेवा करायला शिकवले… प्रत्येक माताभगिनींचा मानसन्मान शिकवला… अडचणीत असलेल्यांना मदत करायला शिकवले… आपल्या देशावर… राज्यावर आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवले… याची काळजी घ्यायला शिकवले… आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसर्‍या धर्माचा आदर सन्मान करायची शिकवण दिली… पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत जगलेल्या अंधारात चाचपडणार्‍या समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवले… लढायला आणि आत्मविश्वासाने उभं करायला शिकवले असेही त्यांनी सांगितले.

स्वराज्य

आपल्याला महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवायचा आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्या काळात, साडेतीनशे वर्षापूर्वी देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. जागतिक दर्जाचे एक मॅनेजमेंट गुरू असू शकतात याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. रयतेची काळजी घेणारा एक महान राजा म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाजी महाराज भोगवादी राजा नव्हे तर खरे रयतेचे राजे होते शेतकऱ्यांचे कैवारी… कलावंताचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात कृतीत आणली, असेही अजितदादा म्हणाले.

स्वराज्य

आपल्या राजाने महाल नाही तर गडकिल्ले उभारले -छगन भुजबळ

महाराजाच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया आपल्या महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजूटीने, एकदिलाने काम करुया. आपला राजा बहुजनांचा मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा होता. आपले भाग्य आहे की हा राजा आपल्या मातीत जन्मला आला असे उद्गार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले. रयतेचा राजा कसा होता हे सांगता आले पाहिजे. हा राजा स्वार्थासाठी कधी लढला नाही तर अन्यायाविरुध्द लढला. आपल्या राजाने महाल नाही तर गडकिल्ले उभे केले. ही खरी आपली संपत्ती आहे असेही ते म्हणाले.

या स्वराज्य यात्रेत सर्वधर्मियांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष विचार घेऊन पुढे जायचे आहे. शिवभक्त या सप्ताहात सहभागी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ काल मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे झाला. गेटवे ऑफ इंडिया येथे आगमन होताच राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन केले. शिवज्योत आणि पताका देऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा, शिवगीते सादर करण्यात आली.

मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी यावेळी स्वराज्य सप्ताहाची माहिती दिली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवा नेते पार्थ पवार, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!