Homeन्यूज अँड व्ह्यूजसेवा खंडित करण्याच्या...

सेवा खंडित करण्याच्या धमक्या दूरसंचार विभाग देत नाही!

दूरसंचार विभाग ही भारतातील दूरसंचार क्षेत्रासाठी धोरणे, कार्यक्रम आणि नियामक आराखडा तयार करण्यासाठीची नोडल संस्था असून नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, दूरसंचार विभाग संपूर्ण देशात विश्वसनीय आणि सुरक्षित संचार सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करते. दूरसंचार विभाग नागरिकांना सेवा खंडित करण्याची धमकी देणारे कॉल करत नाही, असे दूरसंचार विभागाने नुकतेच स्पष्ट केले आहे.

दूरसंचार विभागाकडून दोन तासांत मोबाईल क्रमांक खंडित केले जातील असा दावा करणाऱ्या आक्षेपार्ह कॉल्सबद्दल दूरसंचार विभागाने नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारचे कॉल हे व्यक्तींना फसवण्याचा आणि संभाव्य शोषण करण्याचा फसवा प्रयत्न आहे.

मुख्य माहिती:

  • दूरसंचार विभाग नागरिकांना सेवा खंडीत करण्याची धमकी देणारे कॉल करत नाही.
  • नागरिकांना असे कॉल आल्यास सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
  • दूरसंचार विभागाद्वारे सुचवलेली खबरदारी:
  • पडताळणी: जर तुम्हाला कॉल खंडीत करण्याची धमकी देणारा कॉल आला तर कोणतीही वैयक्तिक माहिती सामायिक करू नका. तुमच्या सेवा प्रदात्यांसोबत अशा कॉलची सत्यता पडताळून पहा.
  • दक्ष रहा : दूरसंचार विभाग दूरध्वनी कॉलद्वारे सेवा खंडीत करण्याचा इशारा देत नाही, हे लक्षात ठेवा, असा कोणताही कॉल संशयास्पद मानला पाहिजे.
  • घटना नोंदवा : राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल https://cybercrime.gov.in  वर कोणत्याही संशयास्पद कॉलची तक्रार करा.

दक्ष राहणे, माहितीची पडताळणी करणे आणि कोणत्याही संशयास्पद घडामोडीची त्वरित तक्रार करणे यावर दूरसंचार विभाग भर देतो. या फसव्या कॉलच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संभाव्य शोषणापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी विभाग कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांसोबत काम करत आहे.

Continue reading

आज दुपारी 12 वाजता साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

आज श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा...

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....
Skip to content