Homeपब्लिक फिगरदेशावरचे संकट आजही...

देशावरचे संकट आजही कायम!

देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सध्याचे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले.

काल आपण स्वातंत्र्यदिवस साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे? महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेच्या  माध्यमातून पोहोचले पाहिजे. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबतची भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. कारण आताच्या सरकारच्या विचारधारेला संविधानाची अडचण आहे, असे ते म्हणाले.

संकट

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. कालच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मागे  बसवले होते. मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी माझी आसनव्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांच्या ओळीत होती. आज राहुल गांधी यांची प्रतिष्ठा गेली. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांना पहिल्या रांगेत बसवले होते. विरोधी पक्षनेता ही संस्था असते. तिचा मान ठेवायचा असतो, असेही पवार म्हणाले. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणायचा सरकारचा प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. या कायद्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्षे तुरुंगात टाकण्याचे प्रयोजन होते. आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगले सरकार आणू. ही लढाई एकजुटीने लढू, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content