Homeन्यूज ॲट अ ग्लांसमुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची ठाकरेंची पवारांना गळ

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारातच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. मेळाव्याला उपस्थित असलेले शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणीही येथेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करावी, आपला त्याला पाठिंबा राहील. तशी घोषणाच आपण करू, असे ते म्हणाले.

ठाकरे

भारतीय जनता पार्टीबरोबर युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्याची पुनरावृत्ती आता आम्हाला नको आहे. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असे जाहीर केले जायचे. एकमेकांच्या पायावर धोंडे मारण्याकरीता आम्ही हेच धोरण वापरायचो. तुमच्या जागा जास्त आल्या तर तुमचा मुख्यमंत्री होईल, म्हणून आम्ही त्यांच्या जागा पाडायचो आणि ते आमची जागा पाडायचे असे व्हायचे. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिले नव्हते. महाविकास आघाडीत तसे होऊ नये, म्हणून आधीच मुक्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, असे ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्याला १० हजार रुपये महिना दिले जाजतात. त्यासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे. अडीच वर्षे काय काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केले, आम्ही काय केले यावर… लाडकी बहीण योजना आणली. पण पैसा कुठे आहे? सरकार पाडायला ५० खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये दिले जात आहेत, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले. कोरोनामध्ये मी या समाजासाठी काम केले. एनआरसी, सीसीए आंदोलनावेळीही आम्ही मुस्लिमांसोबत होतो. पंतप्रधान मोदी यांनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणले आहे. हे विधेयक बहुमत असताना मंजूर का केले नाही? आमचे खासदार त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते, कारण मी दिल्लीत होतो. वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू संस्थांनाच्या जागा असतील तिथे वेडवाकडे होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर आम्ही त्याला विरोध करू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content