Homeहेल्थ इज वेल्थ“टीबीमुक्त पंचायत” उपक्रमाचा...

“टीबीमुक्त पंचायत” उपक्रमाचा रायगड जिल्ह्यापासून शुभारंभ

राज्य टीबी मुक्त करण्याचा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचा संकल्प मिशन मोडवर पूर्ण करूया, असे आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित “टीबीमुक्त पंचायत” अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त धीरज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यातील दहा गावांमध्ये “टीबीमुक्त पंचायत” अभियानाची सुरूवात करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ सालापर्यंत “टीबीमुक्त भारत” करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत  देशभरातील १००० पंचायतींना टीबीमुक्त करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील “टीबीमुक्त पंचायत” अभियानाची सुरूवात रायगड जिल्ह्यातून करण्यात येत आहे. JSW foundationच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील दहा गावांमधील सुमारे दहा हजार नागरिकांची तपासणी करून टीबी रुग्णाचा शोध, निदान, उपचार व निर्मूलन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अभियानाच्या यशानंतर राज्यभर “टीबीमुक्त पंचायत” अभियान राबवण्यात येणार आहे.

या अभियानाला “द युनियन साऊथ इस्ट आशिया (USEA) यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार असून JSW foundation CSRमधून आर्थिक मदत होणार आहे. या बैठकीत MY LABचे handy x-ray मशीन तसेच, खोकल्याच्या आवाजावरून टीबी निदान करणाऱ्या एपचे  प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

कार्यक्रमास राज्याच्या टीबी विभाग सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, सहसंचालक रुग्णालय डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. अशोक  रणदिवे, Jsw foundationचे आशिष जैन, USEA संस्थेचे प्रबोध भाम्बल, शंकर दापकेकर, इंडिया हेल्थ फंडचे माधव जोशी व गुरविंदर तसेच ठाणे, रायगड, पालघर व रत्नागिरी जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content