Monday, November 4, 2024
Homeडेली पल्सलक्षात घ्या! सीमाशुल्क...

लक्षात घ्या! सीमाशुल्क अधिकारी पैशासाठी फोन करत नाहीत!!

भारतीय सीमाशुल्क अधिकारी खाजगी खात्यांमध्ये शुल्क भरण्यासाठी फोन, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सामान्य लोकांशी कधीही संपर्क साधत नाहीत. जर तुम्हाला फसवणुकीचा संशय आला किंवा काही गडबड वाटली तर आलेला दूरध्वनी कॉल बंद करा आणि संदेशांना कधीही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी)ने केले आहे.

भारतीय सीमाशुल्क अधिकारी म्हणून बतावणी करत घोटाळेबाजांनी देशभरातील जनतेची फसवणूक केल्याच्या विविध घटना, वृत्तप्रसारणाची संकेतस्थळे न्यूज पोर्टल्स/समाजमाध्यमांद्वारे उघडकीला आल्या आहेत. ही फसवणूक प्रामुख्याने फोन कॉल किंवा एसएमएससारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करून केली जाते. तत्काळ दंडात्मक कारवाईची ‘कथित’ भीती घालत पैसे उकळण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. या फसवणुकीचा प्रतिकार करण्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) आता एक बहुपदरी जागरूकता मोहीम राबवत आहे.

यामध्ये पुढील बाबी समावेश आहे:

  • वर्तमानपत्रातील जाहिराती
  • नागरिकांना एसएमएस/ईमेल
  • समाजमाध्यम मोहिमा

जनतेसाठी मार्गदर्शक सूचनाः

नीट विचार करा: भारतीय सीमाशुल्क अधिकारी खाजगी खात्यांमध्ये शुल्क भरण्यासाठी फोन, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सामान्य लोकांशी कधीही संपर्क साधत नाहीत. जर तुम्हाला फसवणुकीचा संशय आला किंवा काही गडबड वाटली तर आलेला दूरध्वनी कॉल बंद करा आणि संदेशांना कधीही प्रतिसाद देऊ नका.

संरक्षण: वैयक्तिक माहिती (संकेतशब्द, सीव्हीव्ही, आधार क्रमांक इ.) कधीही कुठेही उघड करु नका किंवा कुणाला पाठवू नका किंवा अज्ञात व्यक्ती किंवा संस्थांना त्यांची ओळख आणि वैधता पटल्याशिवाय पैसे पाठवू नका.

शहानिशा करा: भारतीय सीमाशुल्क विभागाकडून होणाऱ्या सर्व संवादांमध्ये दस्तऐवज ओळख क्रमांक (डीआयएन) असतो‌. सीबीआयसीच्या https://esanchar.cbic.gov.in/DIN/DINSearch या संकेतस्थळावर त्याची वैधता तपासता येते.  

नोंद: अशा प्रकरणांची तात्काळ www.cybercrime.gov.in किंवा हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तक्रार करा.

फसवणूक करण्याकरीता वापरल्या जाणाऱ्या काही सामान्य पद्धती अशा:

बनावट कॉल/एसएमएस: फसवणूक करणारे कुरिअर अधिकारी/कर्मचारी म्हणून कॉल, मजकूरयुक्त संदेश किंवा ईमेलद्वारे संपर्क करतात आणि सीमाशुल्क विभागाने (कस्टम्सने) पॅकेज किंवा पार्सल ठेवलेले आहे आणि ते जारी करण्यापूर्वी सीमाशुल्क किंवा कर भरणे आवश्यक आहे, असा दावा करतात.

दबावतंत्र: सीमाशुल्क/पोलिस/सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणारे घोटाळेबाज परदेशातून  प्राप्त झालेल्या आणि सीमा शुल्क विभागाच्या मंजुरीची (कस्टम क्लिअरन्सची) आवश्यकता असलेल्या कथित पॅकेजेस/भेटवस्तूंसाठी सीमाशुल्क (कस्टम ड्युटी) / माल सोडवण्याचे (क्लिअरन्स फी) शुल्क भरण्याची मागणी करतात. लुबाडण्यासाठी लक्ष्य केलेल्या व्यक्तींना आपला माल सोडवण्यासाठी पैसे भरायला सांगितले जाते.

पैशाची मागणी: लक्ष्यित व्यक्तींना कळवले जाते की त्यांचे सामान, बेकायदेशीर माल (अंमली पदार्थ/परकीय चलन/बनावट पासपोर्ट/निषिद्ध वस्तू) असल्यामुळे किंवा सीमाशुल्क नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कस्टम्सने जप्त केले आहे. फसवणूक करणारे कायदेशीर कारवाई किंवा दंडाची भीती घालत समस्येचे निराकरण करण्यासाठी पैसे देण्याची मागणी करतात.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content