Monday, October 28, 2024
Homeटॉप स्टोरीलाभ घ्या लोकशाहीर...

लाभ घ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्रय रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी- मादिंग, मादिंग,दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी,मांग गोराडी, मादगी व मादिगा या समाजातील गरजू लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई व राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत विविध व्यवसायाकरिता सुविधा कर्जयोजना, कर्जमर्यादा रक्कम ५ लाख रुपये, महिला समृद्धी योजना कर्जमर्यादा रक्कम १.४० लाख, शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा देशाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी रक्कम ३० लाख व परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम ४० लाख याप्रमाणे योजना सुरू करण्यात आल्या असून त्यानुसार जिल्हा कार्यालयात उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. या योजनांची माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जदारांना येणाऱ्या अडीअडचणीचा विचार करून महामंडळामार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://betasladc.org ह्या संकेतस्थळावर करावेत. या कर्जयोजनांचे लाभ घेण्यासाठी अर्ज दि. २० फेब्रुवारी २०२४ ते दि. २० मार्च २०२४ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करावेत.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content