Tuesday, March 11, 2025
HomeTagsRecipe

Tag: Recipe

रेसिपी पाठवा आणि बना ‘महाराष्ट्राचे...

राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन  संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने ...

सोमवारपासून खास खवय्यांसाठी ‘अंगत पंगत’!

'फक्त मराठी वाहिनी'ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा,...

रेसिपी पाठवा आणि बना ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’!

राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन  संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी  दिली. स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसिपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे  प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे.  https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध  भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा विविध खाद्यसंस्कृती लोकप्रिय आहेत. पर्यटक महाराष्ट्रात आल्यानंतर स्थानिक खाद्यपदार्थांचा आवर्जून आस्वाद  घेतात. आता महाराष्ट्रातील अशा विविध रेसिपी देश आणि जगभरातील पर्यटकांपर्यंत  पोहोचवून त्यांना चालना देण्यात येणार आहे. यात राज्याच्या विविध भागातील पाककलाप्रेमींनी सहभागी होऊन महाराष्ट्राचे मास्टरशेफ बनावे, असे आवाहन डॉ. सावळकर  यांनी केले आहे.  स्पर्धेत सहभागासाठी आपल्या आवडत्या महाराष्ट्रीय डिशची व्हिडिओ रेसिपी ऑनलाईन  सबमिट करावयाची आहे. 11 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा असेल. व्हिडिओ किमान 30 सेकंद आणि कमाल 15 मिनिटांचा असणे आवश्यक आहे. व्हिडिओचा आकार 100  एमबीपर्यंत असावा. व्हिडिओ रेसिपीसह त्यातील घटक आणि पद्धतीची माहिती लिखित  स्वरुपातही सोबत सादर करणे आवश्यक आहे. अभिनव शूटिंग शैली, अन्नाचे सादरीकरण,  प्रादेशिक महाराष्ट्रीय रेसिपी, महाराष्ट्रीय पदार्थांचा वापर, अन्नपदार्थ स्वच्छ, आरोग्यदायी  ठेवण्यासाठी काळजी आदी बाबींच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल. मजकूर, संभाषण किंवा व्हॉईस-ओवर हा मराठी किंवा इंग्रजी भाषेत वापरला जाऊ शकतो. व्हिडिओंना कोणताही वॉटरमार्क नसावा. असे व्हिडिओ अपात्र ठरविले जातील. तज्ज्ञ शेफ्सच्या समितीमार्फत  विजेत्यांची निवड केली जाईल.

रेसिपी पाठवा आणि...

राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन  संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी  दिली. स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसिपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे  प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे.  https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध  भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी,...

सोमवारपासून खास खवय्यांसाठी...

'फक्त मराठी वाहिनी'ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा, वारसा कलेचा’ म्हणत मनोरंजनाची परंपरा अखंडित जपली आहे. वाहिनीने पाककलेवरील 'अंगत पंगत'या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अशा आगळ्यावेगळ्या...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content