Saturday, November 23, 2024
HomeTagsMedical education

Tag: Medical education

परिचारिकांना किमान समान वेतन मिळणार?

कोविड-19सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे...

परिचारिकांना किमान समान वेतन मिळणार?

कोविड-19सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन  मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची बैठक आज  मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय संचालकडॉ. तात्याराव लहाने, नियामक परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. आज किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हेसुध्दा स्पष्ट  करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच  परिचारिकासुद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने परिचारिकांना  किमान समान वेतन ठरविण्यात यावे आणि शासकीय आणि खाजगी रुग्णालयात काम  करणाऱ्यांना ते समान मिळावे याबाबत आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने  आजच्या बैठकीनंतर तातडीने सुरू करावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले. थिंक टँक नेमावा वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागत असते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्वसमजून आले आहे. आज  शाळांमध्येसुद्धा परिचारिका असणे आवश्यक आहे. कारखाने, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणीसुद्धा तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे. आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीची संधी कशी उपलब्ध होऊ शकेल, कोणता  अभ्सासक्रम नव्याने सुरू करण्याची आवश्यकता आहे हा विचार करण्यासाठी मंडळाने थिंक  टँक नेमावा, जेणेकरुन हा थिंक टँक या क्षेत्रातील वेगवेगळया संधीचा सांगोपांग विचार करू  शकेल, असेही ते म्हणाले. सध्या राज्यात मुंबई आणि पुणे वगळता महाराष्ट्रातील अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागात  रुग्णालयांमध्ये परिचारिकांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे येणाऱ्या काळात मंडळाने  परिचारिकांची आवश्यकता किती आहे याबाबतचा अहवाल तयार करावा तसेच परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यालाही प्राधान्य देण्यात यावे असेही वैद्यकीय  शिक्षण मंत्री देशमुख यांनी नमूद केले. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात नर्सिंग अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल परीक्षा  हॉस्पीटलमध्ये घेण्याबरोबरच ऑनलाईन थेअरी परीक्षा घेता येऊ शकेल याबाबतची शक्यता  तपासणे, अभ्यासक्रमासाठी नेमकी किती फी असावी याबाबत धोरण ठरविणे, मंडळावर  आकृतीबंधामध्ये मंजूर असलेल्या पदांची नियुक्ती करणे, मंडळाच्या कार्यालयासाठी जागा घेणेआदी विषयांवर आवश्यक ती कार्यवाही  करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

परिचारिकांना किमान समान...

कोविड-19सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन  मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची बैठक आज  मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय संचालकडॉ. तात्याराव लहाने, नियामक परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. आज किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हेसुध्दा स्पष्ट  करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच  परिचारिकासुद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने परिचारिकांना  किमान समान...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content