Homeपब्लिक फिगरलतादीदींच्या स्मृतीप्रीत्यर्थ साकारणार...

लतादीदींच्या स्मृतीप्रीत्यर्थ साकारणार ‘स्वरांचा कल्पवृक्ष’!

स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर स्वररुपाने अजरामर आहेत. लतादीदींच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ हा स्मृतिस्तंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व लोढा फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. या स्तंभाचे भूमिपूजन लतादीदींच्या भगिनी उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते व राज्याचे पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आले.

लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून हा छोटेखानी सोहळा पार पडला. डी विभागातील वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन, ताडदेव) येथील वाहतूक बेटामध्ये ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ या संकल्पनेवर आधारित स्मृतीस्तंभ उभारण्यात येणार आहे. मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाचा भाग म्हणून, डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) येथील मंगेशकर कुटुंबियांच्या ‘प्रभूकूंज’ या निवासस्थानाच्या दर्शनी भिंतीवर भित्तिशिल्पदेखील साकारण्यात येणार आहे. स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

या दोन्ही कामांच्या भूमिपूजनप्रसंगी मीनाताई मंगेशकर-खडीकर, आदिनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक नितीन मुकेश, प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्य, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे व अन्य मान्यवरदेखील उपस्थित होते.

स्वरांचा कल्पवृक्षस्तंभाची ठळक वैशिष्ट्ये:

सदर स्तंभ स्टील व खरेखुरे झाड यांचा वापर करून साकारण्यात येणार आहे. या स्तंभाची ऊंची सुमारे ४० फूट असेल.

झाडाच्या सतत वाढीस चालना देण्यासाठी पूर्णपणे मातीचा वापर करण्यात येणार आहे. जादुई स्वरुपाचे रूपक तयार करण्यासाठी मिरर स्टील उपयोगात आणले जाणार आहे.

सदर स्तंभाच्या कलाकृतीतून धरतीचे आकाशाशी झालेले मीलन चित्रित करण्यात येणार आहे.

हा ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ स्तंभ बृहन्मुंबई महानगरपालिका व लोढा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्याचे नियोजित आहे.

प्रभूकूंजनिवासस्थानाच्या दर्शनी भिंतीवरील भित्तिशिल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

सदर भित्तिशिल्पातून लता मंगेशकर यांच्या जीवनप्रवासातील ठळक तसेच विशेष उल्लेखनीय प्रसंग दर्शविण्यात येणार आहेत.

क्यू आर कोडच्या माध्यमातून लतादीदींच्या विशेष छबी, सादरीकरणाची चित्रणे, नावाजलेली अजरामर गीते, सहकार्‍यांची मनोगते इत्यादी बाबी अंतर्भूत करण्याचेदेखील नियोजित आहे.

सदर भित्तिशिल्प ४० फूट लांब व १५ फूट रुंद आकाराचे असेल. त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

Continue reading

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...

बंगालमध्ये राजकीय ‘ग्रँड स्लॅम’! लिएंडर पेसला भाजपमध्ये ‘स्पेस’!!

भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि 'कोलकाता बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता 'घासफूल'...

केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसाठी मोदी प्रयत्नशील!

केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे...
Skip to content