Wednesday, November 6, 2024
Homeकल्चर +तनुष निलपवार 'सुपर...

तनुष निलपवार ‘सुपर टॅलेंटेड किड’!

फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा आधार घेत नव्या शिक्षण धोरणाचा अवलंब करणाऱ्या पुण्याच्या द अकॅडमी स्कूलच्या एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकवण्याचा पराक्रम केला आहे. वयाच्या सहाव्या वर्षी रसायनशास्त्राच्या आवर्त सारणीतील म्हणजेच Periodic Tableमधील सगळ्याच्या सगळ्या ११८ घटकांचं वाचन फक्त ५४ सेकंदात करत तनुष निलपवार या विद्यार्थ्याने अनोखा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याला ‘सुपर टॅलेंटेड किड’ ही पदवी बहाल केली आहे.

रसायनशास्त्राचा पाया मानल्या जाणाऱ्या आवर्त सारणीत ११८ रसायनांचा आणि त्यांच्यातील परस्परसंबंधांचा समावेश असतो. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तनुषने फक्त ५४ सेकंदांत या सारणीतील ११८ घटकांचं वाचन करण्याचा विक्रम केला. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याच्या या पराक्रमाची नोंद करण्यात आली. त्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्येदेखील इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तसंच तनुषची स्मरणशक्ती अविश्वसनीय असल्याची पावतीही त्यांनी दिली. 

तनुषची स्मरणशक्ती उत्तम आहे, हे आम्हालाही जाणवलं होतं. असे कलागुण किंवा अशी प्रतिभा असलेले विद्यार्थी खूप कमी असतात. त्यांच्या प्रतिभेला फुलण्यासाठी पोषक वातावरण आम्ही द अकॅडमी स्कूलमध्ये पुरवतो. यात शिक्षकांची भूमिकाही मोलाची असते. विद्यार्थ्याच्या कलाने आणि त्याच्या कलेचा आदर करत शिक्षकांनी त्याला घडवलं, तर तनुषसारखे अनेक विद्यार्थी घडतील, अशी प्रतिक्रिया द अकॅडमी स्कूलच्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांनी व्यक्त केली.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content