Homeहेल्थ इज वेल्थमहाराष्ट्रात उष्माघात क्लिनिकची...

महाराष्ट्रात उष्माघात क्लिनिकची आवश्यकता!

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा रूग्णालयात, उप जिल्हा रूग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच दवाखान्यात उष्माघात (सन स्ट्रोक) क्लिनिक सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

यापूर्वीही अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करण्यात आली होती. सध्याचे वाढते तापमान पाहता संपूर्ण राज्यभर असलेल्या सरकारी दवाखान्यात तसेच रूग्णालयात उष्माघाताने त्रस्ता झालेल्या रूग्णांवर तातडीने उपाय करण्याची सोय उपलब्ध करावी. त्याचवेळी प्रत्येक ठिकाणी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लोकांनी कोणती काळजी घ्यावी हे स्पष्ट करणारे फलक प्रदर्शित केले जावेत. वेगवेगळ्या माध्यमांतूनही ही माहिती दिली जावी. त्यामुळे जनतेला स्वतःचा बचाव करणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले.

उष्माघात

लोकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, डोक्यावर टोपी वा रूमाल बांधावा, थोड्या थोड्या वेळाने पाणी, सरबत पिणे आवश्यक आहे. अशा सूचना राज्यशासनाच्या प्रसिद्धी खात्याकडून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र,  मराठवाडा, कोकण येथे विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या क्लिनिकमधल्या स्टाफला विशेष ट्रेनिंग द्यावे, अशी सूचनाही डॉ. दीपक सावंत यांनी केली.

उष्माघात आणि त्यापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व हेल्थ पोस्टवर अशा रूग्णांवर प्राथमिक उपचार करून क्रिटीकल पेशन्टना महानगरपालिका रूग्णालयांत पाठवल्यास रूग्णालयांवरही अतिरिक्त ताण येणार नाही, असेही ते म्हणाले.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content