Homeपब्लिक फिगरएकविसाव्या शतकात असे...

एकविसाव्या शतकात असे उपक्रम महत्वाचे

एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी  पुणे पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी मंगळवारी रात्री भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, राज्य मराठी विकास संस्थेचे माजी प्रभारी संचालक प्रा. आनंद काटीकर आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार यांनी पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून या भव्य आयोजनाबद्दल राजेश पांडे यांचे कौतुक केले. त्यांनी पांडे यांच्याकडून महोत्सवात झालेल्या गिनीज विश्वविक्रमाचीही माहिती घेतली. विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तके मार्गदर्शक ठरतात आणि मुलांना पुस्तकापर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे आयोजन महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content