Homeचिट चॅटस्नेहज्योत दिव्यांग सेवा...

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचा क्रीडा महोत्सव संप्पन्न!

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगांसाठी दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनच्या विस्तीर्ण मैदानावर विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. खासदार गोपाळ शेट्टी, माजी आमदार विनोद घोसाळकर, ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, शिवचरित्राचे अभ्यासक राजू देसाई, कॅप्टन दत्तात्रेय जोशी, शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे, संदीप दळवी आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विनोद घोसाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचा कोणताही कार्यक्रम कधीही आयोजित केला तर त्यांना हे मैदान देऊन आम्ही दिव्यांगांचे एकप्रकारे सेवाच करू. दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनचे मैदान विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच घोसाळकर यांनी या दिव्यांगांतूनच मोठ्या व्यक्ती नावारुपाला येतील, असा विश्वास व्यक्त केला.

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अपर्णा कैकिणी, कार्यवाह सुधा वाघ, दादा पटवर्धन, मिलिंद तेंडुलकर, दीपक पराडकर आदी पदाधिकाऱ्यांनी हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

स्नेहज्योत

या कार्यक्रमासाठी 150 दिव्यांगांनी सहभाग घेतला होता 70 कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेत होते. दहिसर स्पोर्ट्स फौंडेशन, शिवसेवा सामाजिक शिक्षण सेवा संस्था, पोयसर जिमखाना, मातोश्री स्पोर्ट्स फौंडेशन अशा संस्था समाजातील सर्वच थरातील लोकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करीत असतात.

परंतु दिव्यांगांसाठी सरकारने विनामूल्य मैदाने उपलब्ध करून द्यावीत, त्या त्या संस्थांना विनामूल्य जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी करतानाच दहिसर येथील स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या क्रीडा महोत्सवासाठी दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनचे मैदान मोफत उपलब्ध करुन दिल्याबद्दल शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content