Homeचिट चॅटदादा वासवानींच्या स्मरणार्थ...

दादा वासवानींच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण!

साधू वासवानी मिशनचे अध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, यांच्या हस्ते आज साधू वासवानी मिशन, पुणे येथे नुकतेच करण्यात आले. या वेळी केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान, इंदूरचे खासदार शंकर लालवाणी, साधू वासवानी मिशनच्या कार्यकारी प्रमुख कृष्ण कुमारी धाडानी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कल कृष्णकुमार शर्मा, पुणे विभागाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्यासह टपाल विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपाल आणि इतर प्रमुख पाहुण्यांनी साधू वासवानी यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर सर्वांनी साधू वासवानी यांच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘दर्शन’ संग्रहालयास भेट दिली.

या कार्यक्रमानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्री. देवूसिंह चौहान यांनी वारसा स्थळ असलेल्या ब्रिटिशकालीन पुणे मुख्य टपाल कार्यालयास (जी.पी.ओ.) भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी कार्यालयातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित विभागांच्या कार्याची पाहणी केली व सामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. यावेळी चौहान यांच्या हस्ते लहान मुली आणि महिलांना सुकन्या समृद्धी खाते आणि महिला सन्मान बचत खाते यांचे पासबुक वाटप देखील करण्यात आले. त्यांच्या हस्ते मृत विमाधारकाच्या नातेवाईकाना ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बँक’ (आई.पी.पी.बी.) मार्फत काढलेल्या 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. भारतीय डाक विभाग आणि ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बँक’ (आई.पी.पी.बी.) मुळे सामान्य नागरिकांना विविध प्रकारचे बचत खाते आणि विमा संरक्षण उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याचे चौहान यावेळी म्हणाले.

सध्याच्या डिजिटल युगात टपाल खाते देखील अत्याधूनिक होत असून लवकरच पासपोर्ट सुविधा देणारी टपाल कार्यालय देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात सुरू केली जाणार असल्याचे चौहान म्हणाले. याशिवाय देशाच्या ग्रामीण भागात प्रत्येक 5 किलोमिटर अंतरावर बँकिंग सेवा पुरवण्यासाठी पोस्ट पेमेंट बँका सुरू केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटी वेळी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कल, किषणकुमार शर्मा, पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र, रामचंद्र जयभाये,  निदेशिका डाकसेवा, सिमरन कौर यांच्यासह टपाल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content