Homeकल्चर +प्रेग्नंसीनंतर सोनम कपूर...

प्रेग्नंसीनंतर सोनम कपूर पुन्हा दिसणार सेटवर

बॉलिवूड स्टार सोनम कपूर पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेग्नंसीनंतरच्या पहिल्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी सज्ज आहे. हा प्रोजेक्ट एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होणार आहे. तथापि, या प्रोजेक्टची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

सोनमने पुष्टी केली की, “प्रेग्नंसीनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. मला अभिनेत्री असणे खूप आवडते आणि माझ्या प्रोफेशनमुळे अनेक रोचक पात्रांना जगणे आवडते. माणसं मला नेहमीच आकर्षित करतात आणि विविध भूमिका साकारायला मला आवडतं. मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.”

ती म्हणाली, “मी पुढील वर्षाच्या सुरुवातीला सेटवर परतणार आहे. या प्रोजेक्टचे तपशील सध्या ठरवले जात आहेत, त्यामुळे घोषणा होईपर्यंत मी जास्त काही बोलू शकत नाही. हा एक मोठा प्रोजेक्ट आहे, सध्या एवढंच सांगू शकते.”

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content