Homeचिट चॅटटपाल सेवेच्या तक्रारी...

टपाल सेवेच्या तक्रारी सोडवा 20 जूनच्या डाक अदालतीत!

20 जून 2023 रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल 123वी डाक अदालत आयोजित करणार आहेत. ही बैठक ॲनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, 5वा मजला, मुंबई- 400001 येथे होईल. या डाक अदालतमध्ये ज्यांचे पाच आठवड्यांच्या कालावधीत निराकरण झाले नाही, अशा महाराष्ट्र आणि गोव्यातील टपाल सेवेशी संबंधित तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करण्यावर भर राहील.

आपल्या देशाच्या सामाजिक आर्थिक जडणघडणीत टपाल सेवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात तसेच प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणामही करतात. आपल्या ग्राहकांना अत्यंत समाधानकारक सेवा देण्याचा टपाल विभाग प्रयत्न करत असतानादेखील संप्रेषणातील अंतर आणि सेवेतील त्रुटींमुळे अधूनमधून तक्रारी आणि समस्या येऊ शकतात. या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून 123वी मंडळस्तरीय डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

या डाक अदालतमध्ये ज्यांचे पाच आठवड्यांच्या कालावधीत निराकरण झाले नाही अशा महाराष्ट्र आणि गोव्यातील टपाल सेवेशी संबंधित तक्रारींचे आणि समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. ही अदालत विशेषत: अनोंदणीकृत/नोंदणीकृत पत्र, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डर न भरण्याबाबतच्या तक्रारींचा विचार करेल. त्वरीत निराकरण करण्यासाठी, तक्रारकर्त्यांना मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती त्यांची नावे आणि पदांसह तपशीलवार माहिती, तसेच वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाती, प्रमाणपत्रे इत्यादींची तपशीलवार माहिती प्रदान करण्याची विनंती करण्यात आली आहे.

डाक अदालतमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी सहाय्यक संचालक टपाल सेवा आणि डाक अदालत सचिव यांच्याकडे दोन प्रतींच्या रुपात खालील पत्त्यावर सादर कराव्यात: मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, ॲनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, 4 था मजला, मुंबई – 400001. या तक्रारी 5 जून 2023पर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचल्या पाहिजेत.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content