Homeहेल्थ इज वेल्थ17 सप्टेंबरपासून 17...

17 सप्टेंबरपासून 17 कोटींहून जास्त लोकांची 7 आजारांची तपासणी!

आयुष्मान भव कार्ड, आभा कार्डांची निर्मिती, आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण योजना आणि असंसर्गजन्य रोग, क्षय, सिकल सेल आदी विविध रोगांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागांत 17 सप्टेंबर 2023 पासून आरोग्य मेळावे भरवण्यात आले. या काळात 17 कोटींपेक्षा जास्त (17,26,66,845) लोकांनी क्षय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुखाच्या कर्करोग आदी सात प्रकारच्या आजारांच्या चाचण्या करून घेतल्या आहेत. 16 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 86,19,636 लोकांनी या सात रोगांच्या चाचण्यांचा लाभ घेतला आहे.

देशातील तळागाळातील लोकसंख्येपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 13 सप्टेंबर 2023 रोजी गुजरातमधल्या गांधीनगर इथून दूरदृश्य माध्यमातून ‘आयुष्मान भव’ पोर्टलचे उद्घाटन केले व अभियानाला सुरुवात केली. अभियानाला सुरुवात झाल्यापासून आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये भरवलेल्या 12.6 आरोग्य मेळाव्यांना 16 डिसेंबर 2023 पर्यंत10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावल्याची नोंद झाली आहे.

सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये 34,107 आरोग्य मेळावे भरवण्यात आले असून त्यामध्ये एकूण 1,37,84,954 लोकांनी नोंदणी केली.

देशातील तळागाळातील प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा घेऊन जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेतून ‘आयुष्मान भव’ उपक्रम साकारला आहे. त्याद्वारे देशातील प्रत्येक गाव, शहरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

तपासणी

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content