Homeपब्लिक फिगरनोटा उडवणाऱ्या शिवसैनिकांची...

नोटा उडवणाऱ्या शिवसैनिकांची होणार हकालपट्टी!

ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या तालावर नोटा उधळणाऱ्या कथित शिवसैनिकांची चौकशी चालू असून या लोकांना पक्षातून ताबडतोब काढून टाकले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात आणि त्यांच्या दैवताच्या आनंदाश्रमात केवळ पैसेच उडवले नाहीत तर ढोलताशाच्या गजरात धर्मवीरांच्या तसबीरीसमोर नोटांची पुडकी उडवली गेल्याचे नुकतेच समोर आले. या नोटा उडवणारा कोणी आऊ असून तो जिल्हा रुग्णालयात कामगार पुरवतो असे कोर्ट नाका परिसरात दबक्या आवाजात बोलले जात आहे. धर्मवीर स्व. आनंद दिघे नोटा देण्या/घेण्याविरुद्ध होते. असे असताना त्यांच्याच नावाने असलेल्या आश्रमात असे कृत्य होणे म्हणजे त्यांचा अपमानच होय, असे बोलले जात आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content