शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईत कुर्ला पश्चिम स्टेशनजवळील गांधी मैदानात जयशंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने उद्या आठ व नऊ मार्च रोजी सायंकाळी जिल्हास्तरीय शिवछत्रपती करंडक कबड्डी स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिका सेवा मंडळ कुर्ला, लाल बत्ती क्रीडा मंडळ विक्रोळी, भानवे अकॅडमी चुनाभट्टी, टागोर नगर क्रीडा मंडळ विक्रोळी, शितलादेवी स्पोर्ट्स क्लब चेंबूर, शूर संभाजी क्रीडा मंडळ कुर्ला, श्री साई स्पोर्ट सेंटर कांजूरमार्ग हे दिग्गज संघ खेळणार आहेत तर द्वितीय श्रेणी पुरुष गटात हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, पंढरीनाथ सेवा मंडळ चुनाभट्टी, जाणता राजा क्रीडा मंडळ कुर्ला, छावा बॉईज कुर्ला, मिलिंद सेवा मंडळ चुनाभट्टी, भरारी स्पोर्ट्स क्लब चुनाभट्टी, नवजवान क्रीडा मंडळ चुनाभट्टी, लोकमान्य शिक्षण संस्था चेंबूर ह्या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस पाहयला मिळेल. स्पधेत रोख रक्कमेची पारितोषिके आहेत. तसेच वैयक्तिक सर्वोत्तम खेळाडूंनादेखील खास बक्षिसे देण्यात येतील.