Tuesday, February 4, 2025
Homeकल्चर +शर्वरी आता दिसणार...

शर्वरी आता दिसणार आलीया भट्टसोबत!

गॉर्जियस बॉलीवुड स्टार शर्वरीने 2024मध्ये बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तिने वर्षाची सुरुवात ‘मुंज्या’ या 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरसह केली, ज्यामध्ये तिचा डान्स नंबर ‘तरस’ हे ह्या वर्षातील सर्वात मोठ्या म्युझिकल हिट्सपैकी एक बनले. त्यानंतर तिने ‘महाराज’सोबत एक ग्लोबल स्ट्रीमिंग हिट दिला आणि ‘वेदा’मधील तिच्या शानदार अभिनयासाठी एकमुखाने प्रशंसा मिळाली. आता तिने मोठ्या ऍक्शन एंटरटेनर ‘अल्फा’साठी करार केला आहे, जी YRF स्पाय युनिव्हर्स फिल्म आहे आणि ज्यामध्ये ती सुपरस्टार आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

शर्वरी तिच्या बहुमुखी प्रतिभा आणि समर्पणासाठी ओळखली जाते आणि तिचे नृत्यप्रेमदेखील तितकेच खोल आहे जितके तिचे सिनेमाप्रेम आहे. ‘तरस’मधील तिच्या शानदार परफॉर्मन्सने इंडस्ट्रीत खळबळ माजवली आहे. तिला करिअरच्या सुरुवातीला इतक्या मोठ्या डान्स नंबरची संधी मिळणे खरोखरच प्रशंसनीय आहे. शर्वरीचा नृत्याशी असलेला प्रवास कॅमेरा रोल होण्यापूर्वीच सुरू झाला होता. याबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली की, “संगीत सुरू होताच मी लगेच नाचायला लागते. हे माझं लहानपणापासूनच आहे. मोठी होत असताना, मी एक सुपर फिल्मी मुलगी बनली होती आणि स्वतःला एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून कल्पना करत होते. शिफॉन साडी नेलून मोहरीच्या शेतात धावताना आणि हिंदी चित्रपटांच्या सुंदर गाण्यांवर नाचताना दिसत होती.”

शर्वरीने पुढे सांगितले की, “माझ्यासाठी या व्यवसायाचा मी आविष्कार केला आहे आणि निश्चितच ‘तरस’सारखा मोठा डान्स नंबर मिळवण्याचे स्वप्न पाहिले आहे. जेव्हा निर्माते दिनेश विजन सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या डान्स सॉन्गसाठी निवडले तेव्हा मला खूप आनंद झाला. ‘तरस’चे शूटिंग करताना मी माझं सर्वस्व दिलं. हे इंडस्ट्रीला दाखवण्याचं एक साधन होतं की मी चांगला डान्स करू शकते आणि यात मी कोणतीही कसर ठेवली नाही.”

शर्वरीच्या समर्पणाची झलक ‘तरस’ गाण्यात स्पष्टपणे दिसून येते. याबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली की, “मी दररोज स्टेप्सचा सराव केला आणि मला आनंद आहे की लोकांना ते आवडले. जेव्हा मी थिएटर्समध्ये लोकांना माझ्या गाण्यावर नाचताना पाहिले तेव्हा ती माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. मला आशा आहे की, मी माझ्या अभिनय, डांस, मेहनत आणि व्यावसायिकतेसाठी समर्पणासह लोकांचे मनोरंजन करत राहीन. मला बॉलिवूडच्या अग्रगण्य महिलांकडून खूप प्रेरणा मिळते ज्यांनी त्यांच्या डांसने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. माधुरी दीक्षित, रवीना टंडन, श्रीदेवी, करिश्मा कपूर, करीना कपूर, कॅटरीना कैफ यांनी एक अशी परंपरा निर्माण केली आहे ज्यामुळे मला सतत प्रेरणा मिळते.”

Continue reading

श्री उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत ध्रुव भालेराव विजेता

मुंबईतल्या श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत अँटोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल-दादरचा राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेरावने विजेतेपद पटकाविले. मोक्याच्या क्षणी अचूक फटके साधत ध्रुव...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले ‘सुनबाई लय भारी’चे पोस्टर लाँच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "सुनबाई लय भारी" या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच लाँच केले. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित व शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा नवा चित्रपट आहे. मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू करण्यात येणार आहे. सोनाई...

जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन आदींनी लुटला पुष्पोत्सवाचा आनंद!

मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (पूर्वीच्या राणीच्या बागेत) ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाला साधारण दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. यामध्ये अभिनेता जॅकी...
Skip to content