Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्या येवल्यापासून शरद...

उद्या येवल्यापासून शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा नारळ वाढवणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिली.

राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवला असून या वडीलरुपी नेत्याने महाराष्ट्राचा दौरा करावा हा आग्रह केला. त्यानुसार उद्या शनिवार, ८ जुलै रोजी नाशिक जिल्हयाचा दौरा जाहीर केला आहे. सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन शरद पवार निघतील. शरद पवार यांचे ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी या मार्गावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जोरदार स्वागत करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. पदावर नुसती नियुक्ती जाहीर करुन होत नसते तर त्यासाठी क्रियाशील सदस्यांची बैठक घ्यावी लागते. त्यामध्ये ठराव घ्यावा लागतो. त्यानंतरच प्रदेशाध्यक्षपदाची निवड होते. प्रफुल पटेल यांनी सुनील तटकरे यांची निवड केली, ती स्वतः केली. त्यांची क्रियाशील सदस्यांची बैठक झाली नाही. आणि काल राष्ट्रवादीची दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली त्यामध्ये २४ प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसा ठरावही झाला आहे, असेही तपासे म्हणाले.

देशपातळीवर अनेक नेत्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. स्वतः राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आता बेंगळुरूमध्ये होणार्‍या विरोधी पक्षांच्या बैठकीला पवार उपस्थित राहणार आहेत. नियमबाह्य काय आहे हे जनता ठरवू दे. त्यांनी सांगून काही होत नसते. महाराष्ट्रात काही आमदारांच्या सह्या घेऊन स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करू शकत नाही. केरळमध्ये आमदार आहेत तिथे सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत. लक्षद्वीपमध्ये खासदार आहे. नागालँडमध्ये आमदार आहेत. या सर्वांनी शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष अशी घोषणा केली व तसा ठरावही केला आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content