राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला ‘सावली’ हा डान्स बार त्यांच्या मातोश्रींचा असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी येथे छापा टाकून २२ बारबालांना अटक केली होती, असेही त्यांनी सांगितले.

गृहराज्यमंत्री कदम यांनी या बारशी आपला काही संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला. त्यांचे वडिल, शिवसेना नेते, राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी या बारच्या मालक आपली पत्नीी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो शेट्टी नावाच्या एका व्यक्तीला चालवायला दिला असल्याचे सांगितले. एकीकडे आरोप-सारवासारव होत असतानाच प्रत्यक्षात मात्र आरोपानंतर दुसऱ्या दिवशीच त्या बारच्या नावाच्या पाटीवर ताडपत्रीचा पडदा टाकण्यात आला त्याचे हे छायाचित्र! ‘सावली’वर सावली धरण्यात आली, तीही कडक ऊन नसताना…