Homeचिट चॅट‘ओला-उबर’च्या नियमावलीसाठी अभिप्राय...

‘ओला-उबर’च्या नियमावलीसाठी अभिप्राय कळवा ९ मेपर्यंत

केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे. तरी याबाबत नागरिकांनी dycommr.enf1@gmail.com या ई-मेलवर ९ मे २०२३पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्तांनी केले आहे.

याविषयी अधिक माहितीसाठी कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. क्र. ९५५२८८३९३० / ई-मेल- dycommt.enf1@gmail.com). केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांची लिंक अशी आहे. https://morth.nic.in/sites/default/files/notificationsdocument/Motor%20 Vehicle%20Aggregators 27112020150046.pdf

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content