Homeहेल्थ इज वेल्थब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ दुसरी आणि जसलोकमधील पहिली “स्कारलेस” मास्टेक्टमी असून, ती २७ वर्षीय अविवाहित महिलेवर यशस्वीरीत्या करण्यात आली.

रुग्णाच्या डाव्या स्तनामध्ये ४–५ सेंमी आकाराची गाठ आढळल्यानंतर तिला केमोथेरपीद्वारे उपचार देण्यात आले. पुढील जनुकीय तपासणीत BRCA जीन पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याने, प्रगत शस्त्रक्रिया आवश्यक ठरली. पारंपरिक मास्टेक्टमीमुळे मोठा व्रण राहण्याचा धोका असल्याने, एंडोस्कोपिक पद्धत निवडण्यात आली. या प्रक्रियेत छातीच्या बाजूला केवळ ३–४ सेंमीचे छिद्र करून शस्त्रक्रिया केली जाते, ज्यामुळे संवेदना टिकतात आणि कॉस्मेटिक परिणाम उत्तम मिळतात.

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे ऑन्कोप्लासटिक व रोबोटिक ब्रेस्ट सर्जन डॉ. संदीप एम. बिप्ते म्हणाले की, स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या तरुण महिलेचे होणारे भावनिक नुकसान शारीरिक हानीइतकेच लक्षणीय ठरू शकते. आमचा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर ठळकपणे दिसणाऱ्या व्रणाबाबत तसेच शारीरिक स्व-प्रतिमेबद्दल प्रचंड चिंतित होता. मूल्यमापनानंतर आम्ही एंडोस्कोपिक स्किन-अँड निपल स्पेअरिंग मास्टेक्टमीचा सल्ला दिला. या प्रगत, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जिकल प्रक्रियेमध्ये कर्करोगाशी संबंधित सुरक्षितता आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने साधलेली एकसंधता या दोहोंची खबरदारी घेतली जाते, ज्यामुळे रुग्णांना त्यांचा आत्मविश्वास, स्व-प्रतिमा आणि जीवनमानाचा दर्जा पुन:प्रस्थापित होतो. येथे, या प्रक्रियेला मिळालेले यश हे केवळ शस्त्रक्रियात्मक नवसंकल्पनांचे नाही तर आमच्या संपूर्ण टीमने दिलेल्या भक्कम आधाराचे व त्यांच्यातील समन्वयाचे द्योतक आहे. या संपूर्ण वाटचालीत माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी डॉ. सदाशिव चौधरी, नर्सिंग टीम आणि जसलोक हॉस्पिटलच्या संपूर्ण कर्मचारीवर्ग यांच्याप्रती विशेषत्वाने कृतज्ञ आहे.

ही प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीविना पूर्ण करण्यात आली. परिणामी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अगदी कमी अस्वस्थता वाटली व तिची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत झाली. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका दिवसात घरी पोहोचविण्यात आले. या केसविषयी बोलताना चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्हणाले की, हा महत्त्‍वपूर्ण टप्पा म्हणजे जसलोक हॉस्पिटलसाठीचा एक अभिमानाचा क्षण आहे. पश्चिम भारतातील पहिली व्रणरहित एंडोस्कोपिक मास्टेक्टमी व त्यासोबत तत्काळ रिकन्स्ट्रक्शनची शस्त्रक्रिया पार पाडण्यातून नवसंकल्पना आणि रुग्णकेंद्रित देखभालीप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. तरुण रुग्णाची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत झाली आहे. यातून या प्रक्रियेची सुरक्षितता, अचूकता आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळण्याचे आश्वासन ठळकपणे दिसते. रुग्ण वैभवी (नाव बदललेले) म्हणाल्या की, ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी केवळ उपचार नव्हता, तर नव्या आत्मविश्वासाची सुरुवात होती. आज आरशात स्वतःकडे पाहताना मला संपूर्ण व्यक्ती असल्याचा अभिमान वाटतो.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content