Friday, October 18, 2024
Homeकल्चर +वर्ल्ड कप क्रिकेटसाठी...

वर्ल्ड कप क्रिकेटसाठी ‘बोलो भारत माता की जय’..

भारतात सुरू झालेल्या ‘आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३’चे निमित्त साधून ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने भारतीय क्रिकेटपटू आणि नागरिकांमध्ये उत्साहाचा जोश भरण्यासाठी ‘बोलो भारत माता की जय..’ या शीर्षकाचं नवं कोरं उत्स्फूर्त गीत काल ‘अल्ट्रा म्युझिक’वर आणले आहे.

हे प्रेरक गीत हिंदीमध्ये ऐकायला मिळणार आहे. व्हिडिओ आणि ऑडियो दोन्ही स्वरूपात हे गीत उपलब्ध असून ऑडिओ स्वरूपातील गीत सर्व माध्यमांवर ऐकायला मिळणार आहे. हे प्रेरणादायी गीत दीपक चौहान यांनी शब्दबद्ध केले आहे. ‘नील नटराज’ या संगीतकारांनी ते संगीतबद्ध केले असून नील यांनी त्याला स्वर दिले आहेत. हे प्रेरक गीत म्हणजे राष्ट्राचा अभिमान आणि गौरवाचे प्रतीक असून एकतेची हाक आहे. आपल्या राष्ट्राच्या विविधतेत असलेल्या एकात्मिक सामर्थ्याचे स्मरण आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामनात गीत गुंजेल आणि भारतीय क्रिकेटपटूंवरील त्यांचे प्रेम आणि विश्वास वाढवेल. हे प्रेरक गीत भारतीय क्रिकेट संघाच्या ऊर्जेचा स्त्रोत बनून त्यांना कायम प्रेरणा देत राहील, अशी प्रतिक्रिया रसिकांकडून व्यक्त होत आहे.

भारतीय खेळाडूंनी अलीकडेच झालेल्या क्रिकेट आणि आशियाई खेळांमध्ये अभूतपूर्व कामगिरी दाखवली आहे. आता होणाऱ्या विश्वचषकातही प्राविण्य मिळवून देण्‍याची आम्‍ही सर्वजण वाट पाहत आहोत. प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीच्या मनामनात उत्साहाची ठिणगी पेटवण्यासाठी ‘बोलो भारत माता की जय’ हे प्रेरक गीत खास शुभेच्छा आणि आमचा सन्मान समजून आम्ही सादर करत आहोत. हे प्रेरक गीत म्हणजे जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकावण्यासाठीचे खेळाडूंसाठी प्रोत्साहान आहे, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे डायरेक्टर रजत अग्रवाल म्हणाले.

गाण्याची लिंकः https://youtu.be/e9M–6h6o6A?feature=shared

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content