Homeचिट चॅटसतीश पाताडे पुन्हा...

सतीश पाताडे पुन्हा झाले “सेकंड स्ट्राँग मॅन”!

बुजूर्ग छत्रपती पुरस्कारप्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर आणि माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी मध्य प्रदेशच्या इंदोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर विभागात घवघवीत यश संपादन केले. त्यांनी मास्टर्स विभागात तिसऱ्या गटात सलग चार सुवर्णपदके मिळवण्याचा पुन्हा पराक्रम केला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पाताडे यांना “सेकंड स्ट्राँग मॅन” या किताबाने गौरविण्यात आले.

चार दशकांपेक्षा जास्त काळ पाताडे या खेळात असून त्यांनी देशविदेशातील विविध स्पर्धांत खोऱ्याने पदके आतापर्यंत जिंकली आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण गेले काही महिने कसून तयारी केली होती. त्याचेच फळ मला पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत या चार सुवर्ण पदकांच्या रुपाने मिळाल्याची प्रतिक्रिया पाताडे यांनी दिली. युवा खेळाडूंना आज देखील मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याचे पाताडे सरांचे कार्य सुरुच आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content