Homeचिट चॅटमोहिते चषक कॅरम...

मोहिते चषक कॅरम स्पर्धेत सार्थक केरकर अजिंक्य

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर अजिंक्य ठरला. चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये सार्थक केरकरने अचूक खेळासह राणीवर सतत कब्जा मिळवित राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीचा पराभव केला. जिंकलेल्या बोर्डात राणी हुकल्यामुळे महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तनया दळवीला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मुंबईतल्या परळ येथील आरएमएमएस सभागृहात अटीतटीमध्ये रंगलेल्या उपांत्य सामन्यात ६-० असा दमदार प्रारंभ करणाऱ्या चेंबूर हायस्कूलच्या मयुरेश पवारला सार्थक केरकरने १२-६ असे नमविले तर डावाच्या उत्तरार्धापर्यंत १०-७ अशी आघाडी घेणाऱ्या महावीर जैन हायस्कूल-कल्याणच्या संचिता मोहितेला तनया दळवीने १२-१० असे चकविले. परिणामी मयुरेश पवार व संचिता मोहिते यांना उपांत्य उपविजेतेपदावर स्थिरावे लागले. स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व उपविजेते शेठ जुगीलाल पोद्दार अकॅडमीचा प्रसन्न गोळे, आयईएस पाटकर विद्यालयाचे प्रसाद माने, केतकी मुंडले, निधी सावंत तर उपउपांत्यपूर्व उपविजेते न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, जनरल एज्युकेशन स्कूलचा वेदांत लोखंडे, टीआरपी स्कूलचा तीर्थ ठक्कर, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, महावीर जैन हायस्कूलची आर्या बोडके, कानोसिया हायस्कूलची वेदिका पोमेंडकर, ओमकार इंटरनॅशनल स्कूलची प्रेक्षा जैन, आयईएस सुळे गुरुजी हायस्कूलची ग्रीष्मा धामणकर आदी ठरले.

पंचाचे कामकाज प्रशिक्षक सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, संतोष जाधव, अर्जुन कालेकर यांनी पाहिले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, जी. बी. गावडे, मंगेश चिंदरकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content