Friday, November 8, 2024
Homeमाय व्हॉईससरनाईक प्रतापी पण,...

सरनाईक प्रतापी पण, तरीही दुर्दैवी!

मी दिसायला त्यांच्यापेक्षा सुंदर.. अभिनयात सरस.. माझी शरीरयष्टी सुडौल.. माझा पार्श्वभाग सेक्सी.. माझा आवाज गोड.. माझी अदा मोहक.. माझा प्रत्येक अवयव जोरदार व जागेवर.. तरी नाचायला मी मागे, कोरसमध्ये आणि त्या मुख्य नर्तिका असे का? किंवा मी अधिक हुशार तरीही माझा पहिला नंबर का नाही? मी कायम दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर का फेकली जाते किंवा अधिक उत्तान नाचते.. पदर खाली करून.. ते बसतात त्या टेबलवर जाऊन वाकते.. तरी पिंट्या शेट बारमध्ये आले की माझ्यावर नाही, तिच्यावरच का वाट्टेल तेवढे पैसे उधळून मोकळे होतात? ही, अशी दुःखे जशी अनेकांना अस्वस्थ करून सोडतात, हुबेहूब तसेच आमदार प्रताप सरनाईक यांचे दरवेळी होते.

म्हणजे जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांना जितेंद्र आव्हाड यांनी कायम पायात पाय घालून आधी पाडले. नंतर कायम मागे सारले.. म्हणून प्रताप सरनाईक मुद्दाम म्हणजे आव्हाड यांना वाकुल्या दाखवत त्यांना खिजवत शिवसेनेत गेले. पहिल्या संसारात नवऱ्याने गाभण ठेवले नाही म्हणून त्याला सोडून दुसऱ्या संगे पळून आले तर हेही नवरोबा रातभर तळमळत ठेवू लागले.. तसे पुन्हा प्रताप सरनाईक यांचे झाले.

म्हणजे तेथे आव्हाड यांनी सुचू दिले नाही आणि येथे तर तगडी स्पर्धा होती. थेट वाघोबा एकनाथ शिंदे शर्यतीत होते. त्यामुळे सरनाईक राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले खरे, पण त्यांची जी कुवत व ताकद होती त्यापेक्षा एकनाथ शिंदे नेता व नेतृत्त्व म्हणून कायम उजवे ठरल्याने येथेही प्रताप सरनाईक यांची उपेक्षा झाली. त्यांच्या मनातल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. अलीकडल्या त्यांच्या लेटर बॉम्बमुळे ते पुन्हा चर्चेत आल्याने नेमके काय घडले व काय घडणार आहे हेच तंतोतंत आणि जसेच्या तसे तुम्हाला येथे सांगायचे आहे..

प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक मेहनती आहेत, जिद्दी आहेत, निर्भय आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीतल्या जितेंद्र आव्हाड यांना तगडे आव्हान नक्की उभे केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी अतिशय प्रभावी असलेल्या अजितदादांना ते चिपकून, बिलगून, मिठीत घेऊन, ठेवून होते. पण इकडे आव्हाड थेट अगदी सुरुवातीपासून मोठ्या शेठला घट्ट पकडून होते. म्हणजे शरद पवार यांचा खास माणूस.. त्यातून अजितदादांनादेखील प्रसंगी अंगावर घेणारा.. हीच इमेज जितेंद्र आव्हाड यांनी निर्माण केल्याने प्रयत्न करूनही सत्तेच्या बाबतीत ठाणे जिल्ह्यात प्रताप कायम नावडत्या सवतीसारखे राष्ट्रवादीमध्ये बॅकफुटवर होते.

दोघांमध्ये आधी घट्ट मैत्री होती. म्हणजे प्रताप यांना आव्हाड यांनी उठ म्हणायचं अवकाश की प्रताप धावायला लागायचे. त्या दोघात शोलेमधल्या वीरू व जयसारखी घट्ट मैत्री होती. फक्त दोघांची मैत्रीण एकच नव्हती, एवढाच काय त्या दोघात फरक. नंतर मात्र प्रताप अगदी उघड जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देऊ लागले आणि त्यांच्या जाचातून व त्रासातून ते अजिबात इच्छा नसताना राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि शिवसेनेत गेले. येथेही नेमके तेच घडले. येथे तगडा घोडा आव्हाड होते तेथे तर थेट शक्तिमान वाघाशी गाठ पडली. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रताप सरनाईक यांनी स्वतःचा अनंत तरे होऊ दिला नाही. याउलट जेव्हा प्रताप सरनाईक ही शिवसेना वाढवणारी मोठी शक्ती आहे हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले मग त्यांनी भलेही प्रताप यांना मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला नाही, पण मिठीतही घेतले नाही.

त्यानंतर मात्र मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रताप यांनी मातोश्रीवर प्रवेश मिळविला. प्रताप यांची दोन्ही मुले आदित्य ठाकरे गटात मिळून मिसळून राहू लागले. त्याचवेळी प्रताप सरनाईकांनी अलगद मातोश्रीवर दबदबा असलेल्या संजय राऊत यांच्याशी आधी मैत्री केली, नंतर हळूच संजय राऊत यांचा खास माणूस अशी स्वतःची ओळख निर्माण केली. पण एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद कल्पनेपलीकडे आहे. विशेष म्हणजे ज्या चुका आनंद दिघे यांनी केल्याने त्यांना पुढे हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचा अंत झाला, अशी घोडचूक कमी बोलणाऱ्या पण मनात ठेवून नेमके राजकीय गेम खेळून नेम धरणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी केली नाही.

मी म्हणजे ठाणे जिल्ह्यातली शिवसेना हे महत्त्व आणि वर्चस्व त्यांनी आजही कायम ठेवल्याने प्रताप यांचा कायम कोरसमध्ये नाचणाऱ्या उत्तम नर्तिकेसारखा राजकीय कचरा झाला. प्रताप म्हणजे वर्गातली सेक्सी मुलगी.. म्हणजे चान्स मिळाला की चावट मुले तिचे मुके घेऊन मोकळे होतात. पण मिठीत मात्र एकनाथ शिंदे यांच्याच विसावतात..

(पुढे चालू) 

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...
Skip to content