मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनानिमित्त झालेल्या मंगला अडसूळ स्मृती चषक ८/१०/१२ वर्षांखालील शालेय बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकर, नील भट, रेयांश जैन यांनी अपराजित राहून सर्वाधिक ५ साखळी गुणासह निर्विवाद विजेतेपद पटकाविले. सरदाना मिरी, शानया दोशी, आस्या चव्हाण यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुद्धीबळ संघटना सहकार्यित स्पर्धेप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व बुद्धीबळपटूंच्यावतीने विशेष गौरव कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.
मंगला अडसूळ स्मृती ८ वर्षांखालील बुद्धीबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकरने (५ गुण) प्रथम, वेद मीलनने (४.५ गुण) द्वितीय, विराज बदानीने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये सरदाना मिरीने (३ गुण) प्रथम, समीरा थोरातने (३ गुण) द्वितीय, जिवी गालाने (२.५ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला. १० वर्षांखालील मुलांमध्ये नील भटने (५ गुण) प्रथम, रेयांश त्रिवेदीने (४ गुण) द्वितीय, आशय महाजनने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये शानया दोशीने (३ गुण) प्रथम, शरण्या महेश्वरीने (३ गुण) द्वितीय, वेदा फुरीयाने (२ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. १२ वर्षांखालील गटात मुलांमध्ये रेयांश जैनने (५ गुण) प्रथम, वेदांत मगरेने (३.५ गुण) द्वितीय, दीप फुणगेने (३.५ गुण ) तृतीय आणि मुलींमध्ये आस्या चव्हाणने (३.५ गुण) प्रथम पुरस्कार जिंकला.