Wednesday, January 15, 2025
Homeबॅक पेज‘सिंगापूर एअर शो’साठी...

‘सिंगापूर एअर शो’साठी ‘सारंग’ सज्ज!

भारतीय हवाई दलाच्या (आएएफ) सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन संघाने 18 फेब्रुवारी 2024 रोजी पहिले सराव प्रदर्शन केले होते. यापूर्वी म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी हा संघ सिंगापूरला पोहोचला. रिपब्लिक ऑफ सिंगापूर हवाई दलाच्या (आरएसएफ) चांगी हवाई तळावरून या प्रदर्शनासाठी संघ कार्यरत आहे. सिंगापूर एअर शो आज, 20 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होणार आहे. या एअर शोमध्ये जगभरातील हवाई प्रदर्शन करणारे विविध संघ सहभागी झाले आहेत. या शोमध्ये अग्रगण्य विमान आणि विमानाची कार्यप्रणाली  निर्माण करणारे तसेच, प्रणाली चालक आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.

भारताच्‍या सारंग संघाने यंदाच्या प्रदर्शन कार्यक्रमामध्‍ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल), निर्माण केलेले ध्रुव या प्रगत आणि वजनाने हलक्या हेलिकॉप्टरचे पहिल्यांदाच प्रदर्शन करण्‍यात येणार आहे. तथापि, सारंग संघाने आपले पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन याआधी 2004मध्ये सिंगापूरच्या चांगी प्रदर्शन केंद्रामध्‍ये आशियाई एरोस्पेस एअर शोमध्‍ये केले होते.

सारंग संघाकडून यावर्षी सिंगापूर एअरशोमध्ये प्रेक्षकांसाठी चार हेलिकॉप्टरचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.  त्‍यानुसार प्रदर्शनामध्ये ध्रुवमध्‍ये असलेली चपळाई तसेच या हेलिकॉप्टरची यंत्रणा हाताळणा-या भारतीय हवाई दलाच्‍या वैमानिकांमध्‍ये असलेले उच्च दर्जाचे कौशल्य अधोरेखित होणार आहे. स्वदेशी बनावटीचे ध्रुव आणि त्याचे अत्याधुनिक, प्रगत विविध प्रकार भारताच्या सर्व लष्करी सेवांमध्‍ये वापरले जात आहेत. सिंगापूर एअर शो, या व्‍यासपीठाचा वापर करून, त्‍याव्दारे यशस्वी प्रदर्शन करून भारताने संरक्षण क्षेत्रामध्‍ये आत्‍मनिर्भर बनण्‍यासाठी जे कार्य केले आहे, त्‍याची यशोगाथा जगामध्‍ये पोहोचवणे शक्य होणार आहे.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content