Monday, October 28, 2024
Homeबॅक पेजतापसी पन्नूच्या उपस्थितीत...

तापसी पन्नूच्या उपस्थितीत ‘इस्रो’च्या कामगिरीला सलाम

भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ लाइफने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)च्या सहचांद्रयान आणि सौर मोहीम, आदित्य L1च्या अतुलनीय कामगिरीबद्दल बेंगळुरूच्या श्री कांतीरवा आउटडोअर स्टेडियममध्ये #Plankathonची चौथी आवृत्ती नुकतीच साजरी केली. हा ऑन-ग्राउंड प्लँकाथॉन इव्हेंट कंपनीच्या प्रचंड लोकप्रियतेचा कळस होता. या मोहिमेद्वारे इस्रोच्या शास्त्रज्ञांना सलाम करण्यासाठी #PlankForAces ने भारतीयांना एकत्र येण्याचे आमंत्रण दिले. त्यांना अब्डोमिनल प्लँक करत व्हिडीओ उपलेड करण्यास सांगितले. 

बेंगळुरू येथील प्लँकाथॉन इव्हेंटमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था मुख्यालयातील क्षमता निर्माण आणि पब्लिक आउटरीचचे संचालक एन सुधीर कुमार यांच्या नेतृत्त्वातील टीम, भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि मिशन मंगल आणि डंकी यासह अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारी तापसी पन्नू यांनी ग्राउंडवरील संपूर्ण प्लँकाथॉन इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तरुण चुघ आणि बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य विपणन अधिकारी चंद्रमोहन मेहरा हेही पन्नू यांच्यासह उपस्थित होते. अब्डॉमिनल प्लॅँक करणाऱ्या लोकांच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन व्हिडिओ अल्बमसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सला हा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जाहीर केला. #PlankforAces ने सर्व विभागातील लोकांकडून 5,194 व्हिडिओ अपलोड केलेले पाहिले.

बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सच्या प्लँकाथॉन 2024मध्ये उपस्थितांना संबोधित करताना, भारतीय अंतराळ संशोधन संस्था मुख्यालयचे क्षमता निर्माण आणि सार्वजनिक पोहोचचे संचालक एन सुधीर कुमार म्हणाले की, ही खरोखरच एक विलक्षण घटना आहे, जी सामूहिक भारतीय भावना दर्शवते. #PlankForAcesसारख्या उपक्रमाद्वारे, बजाज अलियान्झ लाइफने हजारो लोकांना त्यांच्या देशाविषयीची उत्कट इच्छा, तसेच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याची प्रेरणा देऊन एकत्र आणले आहे. आम्ही त्यांच्या प्रयत्नांसाठी सहभागी झालेल्या प्रत्येकाचे कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. तुमच्या शुभेच्छा भारताला अभिमानास्पद बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधिक चालना देतील, कारण आम्ही अंतराळ संशोधनातील नवीन सीमांवर आमचे लक्ष केंद्रित केले आहे.

#PlankForAces च्या यशाबद्दल आणि कंपनीसाठी एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यावर भाष्य करताना, बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य विपणन अधिकारी चंद्रमोहन मेहरा म्हणाले की, बजाज अलियान्झ लाइफ प्लँकाथॉनला भारताच्या प्रमुख फिटनेस उपक्रमापैकी एक आहे. या उपक्रमातून राष्ट्रृभावना विकसित झाली आहे. ISROच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आपले कौतुक व्यक्त करण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन सहभागी झालेल्या हजारो सहभागींचे आम्ही आभारी आहोत, ज्यामुळे आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. जागतिक विक्रमी पराक्रमापेक्षा काहीही ISROच्या कौतुकास कमी पात्र ठरले असते.

भारतातील आघाडीची सिनेअभिनेत्री आणि बॉलीवूडच्या मिशन मंगलमधील प्रमुख महिला अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाल्या की, #PlankForAces चळवळ माझ्या जवळची होती आणि तितकीच प्रेरणादायी होती कारण ती फिटनेसची अशी अनोखी मोहीम होती ज्याने इतक्या लोकांना एकत्र आणले, कारण ISROमधील आमच्या शास्त्रज्ञांचे आभार मानण्याची ही संधी होती! मी बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे त्यांच्या प्लँकाथॉनच्या चौथ्या आवृत्तीबद्दल आणि त्यांच्या नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टायटलसाठी अभिनंदन करते. मला आशा आहे की ज्या प्रत्येकाने आज प्लँक केले आहे किंवा #PlankForAcesसाठी त्यांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्यांनी त्यांची आरोग्य आणि फिटनेस चळवळ सुरू ठेवली आहे आणि आणखी बरेच जण आमच्यासाठी एक निरोगी आणि अधिक चैतन्यशील समुदाय बनण्यासाठी सामील व्हाल.

तापसी पन्नूने बजाज अलियांझ लाइफ इन्श्युरन्सच्या #PlankForAcesच्या ऑन-ग्राउंड इव्हेंटचे नेतृत्त्व केले ते केवळ लोकप्रिय भारतीय चित्रपट मिशन मंगलशी तिच्या तत्काळ सहवासामुळेच नाही तर अभिनेत्रीने तिच्या सर्व भूमिकांमध्ये आणलेल्या उत्कंठा आणि उत्साहामुळे. तिने अनेक विलक्षण चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत ज्यात समाजासाठी मजबूत संदेश आहे, स्वतंत्र असणे, फिटनेस किंवा खेळाबद्दल संदेश आहे. यामुळे तिला बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सच्या फ्लॅगशिप इव्हेंट प्लँकाथॉनच्या चौथ्या आवृत्तीचे नेतृत्त्व करण्याची प्रमुख निवड झाली, जी भारताचे वेगळेपण तसेच नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती.

बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सतर्फे प्लँकाथॉन

बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स ही भारतातील अग्रगण्य खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असून, देशातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 2018मध्ये कंपनीने वार्षिक प्लँकाथॉन चळवळ सुरू केली आहे. या चळवळीत हजारो लोक एकत्र येते. अॅब्डॉमिनल प्लॅंक हा सर्वात सोपा व्यायाम मानला जातो जो एखाद्या व्यक्तीची मुद्रा आणि कोर मजबूत करण्यास मदत करतो. आज, बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने #PlankForAcesच्या पराकाष्ठेसह त्याच्या बहुप्रतीक्षित प्लँकाथॉनची चौथी आवृत्ती साजरी केली.

2018पासून बजाज अलियान्झ लाइफ प्लँकाथॉन वैयक्तिक आरोग्य आणि फिटनेस फायद्यांच्या पलीकडे जात मोठ्या सामाजिक कारणांसाठी योगदान देत आहे.

● पहिली आवृत्ती, #36SecPlankChallenge, हृदया फाऊंडेशनच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांमधील हृदयाचे विकार बरे करण्याशी जोडली गेली होती आणि 2,353 जणांनी प्लँक पोझिशन यशस्वीरित्या धारण केले होते.

● दुसरी आवृत्ती, #PlankForIndiaने OGQ च्या सहकार्याने तरुण भारतीय ऑलिम्पियन्सना पाठिंबा दिला आणि मुंबईत 60 सेकंदांसाठी एकाच वेळी 2,471 लोकांनी प्लँक पोझिशन धारण करून एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.

● तिसरी आवृत्ती #PlankToThankचे उद्दिष्ट हे ७५व्या स्वातंत्र्य दिन भारतीय सशस्त्र दलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि सेवानिवृत्त जवानांसाठी उदरनिर्वाहाची तरतूद करणे हा होता. कंपनीने नवी दिल्लीत एकाच वेळी 60 सेकंदांसाठी 4,454 लोकांच्या अॅब्डॉमिनल प्लॅँक करून स्वतःचा विक्रम मोडला.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content