Homeचिट चॅटडॉ. मीना वैशंपायन...

डॉ. मीना वैशंपायन यांना साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०२३ सालचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथे साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात अंतर्नाद मासिकाचे संपादक व ज्येष्ठ लेखक भानू काळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या विद्यमाने मसापचे माजी कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध समीक्षक के. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी वाङमय क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल दरवर्षी एक मानाचा पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून यंदाचा २०२३चा या पुरस्काराचा बहुमान लेखन, संशोधन, आणि संस्थात्मक कार्य या बहुमोल कार्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांना प्रदान करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेने घेतला आहे.

डॉ. मीना वैशंपायन या एम. ए., बी. एड., पीएच.डी. (मराठी व संस्कृत) असून ख्यातनाम एशियाटिक सोसायटीच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांची दुर्गापर्व, ज्ञानकोशकार केतकर, साहित्यवेध, ‘ती’चं अवकाश, इत्यादी एकूण १४ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुर्गापर्वला राज्य शासनाचा उत्कृष्ट समीक्षेचा पुरस्कार मिळाला आहे. ‘ती’चं अवकाशला सावाना, नाशिक संस्थेचा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पुरस्कारही डॉ. वैशंपायन यांना मिळाला आहे.

डॉ. मीना वैशंपायन यांच्या ग्रंथसंपदेत ‘स्मरण.. असामान्य वाङ्मय-संशोधकाचे’, ‘संस्कृतिसंकराच्या संघर्षांच्या कथा!’, ‘असंही एक वनोपनिषद!’, ‘बखर महायुद्धातील विरांगनांची!’, ‘ऐसा ज्ञानसागरू..’, ‘पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं गाणं!’, ‘हवा आहे चौथा कमरा!’, ‘अस्वस्थ कातरवेळेचे प्रश्नोपनिषद..’, ‘अशीही नामांतरे’, ‘पुस्तकं आयुष्य बदलवणारी.. इतिहास घडविणारी..’, ‘इतिहास.. प्रार्थना समाजाचा!’, ‘प्रश्न विचारण्याचं धाडस’ आदींचा समावेश आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content