Homeचिट चॅटसाहिल नायर लाँच...

साहिल नायर लाँच करताहेत ‘मिला ब्‍युटी’..

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्‍युटी ब्रँड्सचे धोरणात्‍मक समर्थक साहिल नायर त्‍यांचा नवीन उद्यम ‘मिला ब्‍युटी’ (पूर्वीचा मिलाप कॉस्‍मेटिक्‍स) लाँच करण्‍यासाठी सज्‍ज आहेत. व्‍यवस्‍थापकीय संचालक व सहसंस्‍थापक म्‍हणून साहिल भारतातील ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाईन करण्‍यात आलेल्‍या सर्वोत्तम दर्जाच्‍या, नाविन्‍यपूर्ण व टॉक्सिन-फ्री मेकअप उत्‍पादनांसह भारतातील ब्‍युटी उद्योगाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्यामध्‍ये मिला ब्‍युटीचे नेतृत्त्‍व करतील. साहिल यांनी सचिन चढ्ढा आणि केशव चढ्ढा यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोग केला, जे आता मिला ब्‍युटी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या मिलाप कॉस्‍मेटिक्‍सचे सहसंस्‍थापक व संचालक होते.

ब्रँड मेकअप बिगिनर्स व उत्‍साहींच्‍या गरजांची पूर्तता करतो तसेच त्‍यांना सर्जनशीलतेला प्रेरित करणाऱ्या वैविध्‍यपूर्ण, आधुनिक मेकअप आवश्‍यक गोष्‍टींसह त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या अद्वितीय क्षमता अभिव्‍यक्‍त करण्‍यास मदत करतो. अपग्रेडेड सूत्रीकरण व पॅकेजिंगपासून प्रखर चाचणीपर्यंत मिला ब्‍युटी उत्‍साहपूर्ण अनुभवाची खात्री देतो, ज्‍यामधून लक्‍झरी मिळते.

जागतिक दृष्टीकोनामध्‍ये सामावलेला आणि अभिमानाने मेड इन इंडिया ब्रँड मिला ब्‍युटीची देशांतर्गत उत्‍पादन वाढवण्‍यासाठी मानेसरमध्‍ये ३६,००० चौरस फूट फॅक्‍टरी उभारण्‍याची योजना आहे, जेथे दर्जात्‍मक मानकांची पूर्तता केली जाईल. सध्‍याच्‍या १०,००० रिटेल काऊंटर्सच्‍या उपस्थितीसह साहिल नायर यांची देशभरात ही आकडेवारी दुप्‍पट करत २०,००० पर्यंत घेऊन जाण्‍याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

मिला ब्‍युटीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व सह-संस्‍थापक साहिल नायर म्‍हणाले की, मिला ब्‍युटी आकर्षक दरांमध्‍ये उत्‍साहित ब्‍युटीसाठी ओळखला जातो. आमच्‍या उत्‍पादनक्षमता वाढवत आणि रिटेल उपस्थिती वाढवत आम्‍ही सर्वांसाठी प्रीमियम ब्‍युटी उत्‍पादने उपलब्‍ध करून देण्‍याप्रती समर्पित आहोत. उद्योगातील दिग्‍गज सचिन व केशव चढ्ढा यांच्‍यासोबतचा सहयोग आम्‍हाला आत्‍मविश्‍वासाने व कुशलतेने पुढे जाण्‍यास सक्षम करतो. ‘ब्‍युटी बीगिन्‍स विथ यू’ हे आमचे फक्‍त तत्त्व नसून ग्राहकांना वचनदेखील आहे.

मिला ब्‍युटीच्‍या सध्‍याच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये फेस, लिप, आय व नेल श्रेणींसह सर्वोत्तम उत्‍पादनांचा समावेश आहे, जसे प्राइमर, बुलेट लिपस्टिक, लिक्विड लिपस्टिक, कन्‍सीलर, आय लाइनर, नेल पेंट आणि लिप बाम, ज्‍यांची किंमत १०० रूपयांपासून सुरू होते. सर्व उत्‍पादने आघाडीच्‍या ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध असतील. मिलाप कॉस्‍मेटिक्‍सने ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍सवर महसूलामध्‍ये १ कोटी रूपयांचा टप्‍पा गाठला आहे आणि मिला ब्‍युटीमध्‍ये रिब्रँडिंगसह या वर्षात या महसूलात तिप्‍पट वाढ होण्‍याची अपेक्षा आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content