Wednesday, January 15, 2025
Homeमुंबई स्पेशलसागर कातुर्डेची जेतेपदांची...

सागर कातुर्डेची जेतेपदांची नॉनस्टॉप मालिका कायम!

सागर कातुर्डेने आपली जेतेपदांची नॉनस्टॉप मालिका कायम ठेवताना नमो चषक आमदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धेवरही आपलेच नाव कोरले आहे. हे त्याचे गेल्या दोन महिन्यांमधील सलग अकरावे जेतेपद ठरले आहे.

सागर कातुर्डेसाठी २०२४ वर्ष संस्मरणीय ठरले आहे. त्याच्या आखीव-रेखीव शरीरयष्टीसमोर महाराष्ट्रातील एकही शरीरसौष्ठवपटू त्याला मागे टाकण्यात यशस्वी ठरला नाही. मुंबईतल्या घाटकोपर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित या स्पर्धेतही सागरला उमेश गुप्ता, संतोष भरणकर, चेतन नाईक यांनी कडवी झुंज दिली. पण अखेर सागरच विजेता ठरला. संकेत भरमने बेस्ट पोझरचा पुरस्कार पटकावला. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शरीरसौष्ठव संघटनेच्या अजय खानविलकर, राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, भारत श्री शाम रहाटे, आयोजक अनिल निर्मळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

आमदार श्रीचा निकाल:

५५ किलो: १- गितेश मोरे (समर्थ व्यायामशाळा), २- अक्षय गवाणे (पॉवर फिटनेस), ३- रंजित बंगेर (आदित्य जिम), ४- ओमकार साईम (आर एम जिम), ५- हर्षल देशमुख (शेळके जिम)

६०किलो: १- गणेश पाटील (फिजीक जिम),२- रोशन भोसले (परब फिटनेस),३- प्रशांत घोलम (एस बी फिटनेस),४- संजय जाधव  (आर एम भट),५- अनिस शिंदे (सुप्रीमो जिम), ६- ऋषी वयागणकर (राऊत फिटनेस)

६५ किलो: १- उमेश पांचाळ (परब फिटनेस), २- संकेत भरम (परब फिटनेस), ३- अनिल जयस्वाल (सोमय्या कॉलेज), ४- दर्शन सनस(जय भवानी), ५- देवेश पाटील (श्री राम फिटनेस), ६- दीपक साळवी (सुप्रीमो फिटनेस)

७० किलो: १- उमेश गुप्ता (यू जी फिटनेस), २- विलास घडवले (परब फिटनेस), ३- नदीम अन्सारी (सावरकर जिम), ४- लिलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), ५- दिपेश पवार (जय भवानी), ६- कुलदीप राजपूत (राज जिम);

७५ किलो: १- संतोष भरणकर (परब फिटनेस), २- गणेश उपाध्याय (बालमित्र जिम), ३- विशाल धावडे (बालमित्र जिम), ४- मंगेश भोसले (बॉडी वर्कशॉ्प), ५- सूरज निर्मळ (परब फिटनेस), ६- रुपेश दिवे (छत्रपती शिवाजी जिम)

८० किलो: १- सागर कातुर्डे (आयकर विभाग), २- अक्षय खोत (परब फिटनेस), ३- अमित साटम (माँसाहेब जिम), ४- विशाल गिजे (बालमित्र जिम), ५- राजेश जाधव (कर्ल जिम), ६- गणेश नगरकर (सर्वेश्वर फिटनेस)

८० किलोवरील: १- चेतन नाईक (विराज फिटनेस), २- उबेद पटेल (विकी जिम), ३- हरमित सिंग (परब फिटनेस), ४- अभिषेक लोंढे (हरकुल फिटनेस), ५- विजेंद्र ढसाळ (फिटनेस पॉइंट), ६- जीवन सकपाळ(शेळके जिम)

किताब विजेता – सागर कातुर्डै (आयकर)

उप किताब विजेता- उमेश गुप्ता (यु जी फिटनेस).

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content