Wednesday, February 5, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटरॉयल नेव्हीची गस्तीनौका...

रॉयल नेव्हीची गस्तीनौका ‘एचएमएस स्पाई’ची कोचीला भेट!

रॉयल नेव्हीचे एचएमएस स्पाई हे ऑफशोअर गस्ती जहाज 17 ते 27 जानेवारी 2024दरम्यान कोचीच्या सदिच्छा भेटीवर आहे. आगमनानंतर भारतीय नौदल बँडने या जहाजाचे जल्लोषात स्वागत केले.

कोची येथे पोर्ट कॉल दरम्यान, भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही यांच्यात व्यावसायिक आणि सामाजिक संवाद तसेच क्रीडा संबंधी उपक्रम आयोजित करण्यात आले. रॉयल नेव्हीच्या कर्मचार्‍यांनी आयएनएस सुनयनाला भेट दिली आणि दोन्ही नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढविण्याच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक केल्या. कमोडोर पॉल कॅडी, कमांडिंग ऑफिसर, एचएमएस स्पाई यांनी कमोडोर सर्वप्रीत सिंग, चीफ स्टाफ ऑफिसर (परिचालन), दक्षिणी नौदल कमांड यांची भेट घेतली आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

या भेटीदरम्यान, मुख्यालय सी ट्रेनिंग (एचक्यूएसटी) च्या पथकाने एचएमएस स्पाई जहाजावर दलासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना, नुकसानावर नियंत्रण आणि अग्निरोधक प्रशिक्षण मॉड्यूलचे आयोजन केले. या सरावामुळे दोन्ही नौदलांद्वारे अवलंबण्यात येत असलेल्या प्रक्रिया आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी एचक्यूएसटी आणि जहाजाच्या पथकांना मदत झाली. व्यावसायिक देवाणघेवाणीमुळे सागरी सुरक्षा आणि प्रशिक्षणामध्ये परस्पर सहकार्याच्या महत्त्वावर भर देत मजबूत नौदल भागीदारीला चालना देण्याच्या दोन्ही नौदलाच्या वचनबद्धतेचा आदर्श समोर ठेवला.

Continue reading

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...

श्री उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत ध्रुव भालेराव विजेता

मुंबईतल्या श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत अँटोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल-दादरचा राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेरावने विजेतेपद पटकाविले. मोक्याच्या क्षणी अचूक फटके साधत ध्रुव...
Skip to content