Homeकल्चर +चेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः रियाझ अकबर अली चौथ्या फेरीत

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीने मुंबईच्या दीपक कांबळेवर २५-२०, २५-१८ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे मुंबईच्या कौस्तुभ जागुष्टेने मुंबई उपनगरच्या सुहास पोमेंडकरवर तीन सेटमध्ये १३-२५, २४-१४, २५-७ असा विजय मिळवून आगेकूच केली. 

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

निलांश चिपळूणकर (मुंबई) वि वि विजय टेमघरे (रायगड)

ब्लेसिंग सॅमी (ठाणे) वि वि खान इस्माईल महम्मद इब्राहिम (मुंबई उपनगर)

संजय मांडे (मुंबई) वि वि जावेद सय्यद (मुंबई उपनगर) 

अभिजित त्रिपनकर (पुणे) वि वि रमेश देवकुळे (ठाणे)

सिद्धांत वाडवलकर (मुंबई) वि वि लियाकत नागरजी (मुंबई)

विवेक पोदार (मुंबई) वि वि विपुल बाबारिया (मुंबई)

विवेक कांबळे (मुंबई उपनगर) वि वि तेजस म्हात्रे (मुंबई)

असगर शेख (मुंबई उपनगर) वि वि कुलदीप वाघधरे (मुंबई)

रहीम खान (पुणे) वि वि महेंद्र वाघ (मुंबई)

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content