Homeन्यूज अँड व्ह्यूजनिवृत्तीकाळ दिव्यांग खेळाडूंचा..

निवृत्तीकाळ दिव्यांग खेळाडूंचा..

आपण दिव्यांग असावे असे कुणालाही वाटणार नाही आणि ज्यांचा जन्मच दिव्यांग म्हणून झाला आहे त्यांना समज येईपर्यंत त्यांच्या पालकांची अवस्था काय होत असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या कुटुंबातील दिव्यांगाला समाजात योग्य स्थान मिळवून देण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यातील काही आपल्या जिद्दीने पुढे जातात आणि दिव्यांग असूनही एक खेळाडू बनण्याचे स्वप्न उराशी बांधून प्रचंड मेहनत करतात. त्यात प्राविण्य मिळवतात आणि पायरी दर पायरीने यशाची दारे उघडीत आपल्या अथक कष्टांनी त्यांच्यापैकी अगदी बोटावर मोजता येतील इतकेच जागतिक पातळीवर पोहोचतात.

या पातळीपर्यंत पोहोचतानाचा त्यांचा प्रवास किती खडतर असतो याचे कल्पना आपल्यापैकी अनेकांना असते, कारण त्यांनी अशा दर्जेदार आणि म्हणून जात्याच जिद्दी असणाऱ्या या खेळाडूंबद्दल त्यांना रस्ता अभिमान वाटतो. आपल्या देशाचे नाव उंचावणारे हे दिव्यांग खरे तर देशाचे भूषण असतात आणि त्यांची योग्य ती काळजी घेणे हे जसे कुटुंबाचे तसेच ते शासनाचेही काम असते याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

जीवन पुढे सरकत राहते.. कधी सरळ तर कधी अतिशय दयनीय अवस्थेतही आपली जिद्द कायम ठेवून हे खेळाडू आपल्या कौशल्याचा सराव करीत असतात. दिव्यांग असल्यामुळे अगोदरच शरीरात आरोग्याच्या अनेक गुंतागुंती असतात आणि त्यावर मात करीत हे दिव्यांग ताठ मानेने आपल्या कौशल्याच्या बळावर आगेकूच करीत असतात.
अशातच एक काळ स्पर्धांचा आणि त्यात मिळवलेल्या उत्तुंग यशाचा असतो. यावेळी काही असतात व्हीलचेअरवर आणि तरीही खेळत असतात. आणि काही असतात जे कृत्रिम साधनांच्या सहायाने धडधाकट लोकांनाही धडकी भरवतील अशी कामगिरी करतात. त्यांचे जीवन मात्र एका बाजूला इस्पितळे आणि महागडे उपचार आणि शस्त्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला अनेकांना जाणवणारी आणि प्रसंगी भेडसावणारी आर्थिक परिस्थिती यात अडकलेली असते. बरेचदा जगाने त्यांचे कौशल्य दृष्टीआड करावे तर इतर वेळी त्याना अप्रिय घटनांना सामोरे जावे लागावे अशी परिस्थिती जगातील अनेक देशांमध्ये आहे.

यानंतर आपली कौशल्ये कितीही उत्तम असली तरी निवृत्त होण्याचा पर्याय येतो आणि तो कुणालाच चुकत नाही. कोणत्याही खेळाडूसाठी खेळातून निवृत्ती मानसिक दृष्टीने कठीणच असते. परंतु दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत ती अधिकच भयानक रूप धारण करीत असते, असे अनुभव सांगितले गेले आहेत. कुणाचेच ‘करिअर’ आयुष्यभरासाठी नसते आणि दिव्यांगांच्या बाबतीत हेही खरे आहेच. हे एक वळण कुणालाच चुकत नाही. परिवर्तनाच्या या काळात आपण काय करायचे हा निर्णय घ्यायचा असतो. खेळ उपचारतज्ञ असलेल्या डॉ. चेरी ब्लॉवेट यांनी दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये आजवर सात पदके प्राप्त करीत असताना मेडिकल शिक्षण सुरु ठेवले आणि आज त्या खेळ उपचारतज्ञ म्हाणून काम करीत आहेत. त्यांच्या मते मानसिक आरोग्य हा या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय मानला जायला हवा.

ब्रिटीश मेडिकल जर्नलने याच वर्षी त्यांच्या ओपन स्पोर्ट अँड एक्झरसाईज मेडिसीन यामध्ये एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यातील माहितीनुसार असे दिसते की, १८ ते ३९ टक्के निवृत्त दिव्यांग खेळाडूंना चिंता आणि नैराश्य यांचा सामना करावा लागतो आणि २० टक्के लोकांसाठी हा संघर्ष अनेक वर्षे सुरु राहतो. एकेकाळी आपल्यावर सर्वांची नजर असायची.. डोळे भरून आपले कौशल्य बघत असत. आज मात्र आपण अशा केंद्रस्थानी नाही ही गोष्ट समजून घेणे आणि मनावर बिंबवणे सर्वात कठीण असते. या नव्या भूमिकेत शिरणे आणि ती भूमिका अखेरपर्यंत करीत राहणे यातच आपले भवितव्य आहे असे समजणे यात काहीही चूक किंवा गैर नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

Continue reading

टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्समधले सोने मिळवले तरी दागिने महागच!

फार पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फार बोजड असत आणि त्यामुळे ती सहजपणे हातात मावत नव्हती. त्यानंतर १९६०च्या दशकात हातात वागवण्यासारख्या स्वरुपात ट्रांझिस्टर नावाचे एक उपकरण बाजारात आले. त्यापूर्वी रेडिओ म्हणजे घरच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवून त्यावर कार्यक्रम ऐकता येत...

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...
Skip to content