Friday, November 8, 2024
Homeटॉप स्टोरी‘रमजान’वर आजपासून महिन्याभरासाठी...

‘रमजान’वर आजपासून महिन्याभरासाठी निर्बंध!

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करतानाच राज्य सरकारने काल बुधवारपासून साजरा होणाऱ्या रमजान महिन्यासाठीही विविध स्वरूपांचे निर्बंध टाकणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

यावर्षी १४ एप्रिल ते १३ मे २०२१पर्यंत मुस्लिम समाजातर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरू असलेला कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता या वर्षी पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार शसनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

१. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

२. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करावा.

३. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाजपूर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.

४. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

५. शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतु यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.

६. पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरीता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

७, धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत.

८. कोवीड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात १४४ कलम लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

९. या पवित्र रमजान महीन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

१०. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.

११.पवित्र रमजान महिन्यात सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

१२. कोवीड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

१३. रमझानच्या दिवसभराच्या कडक उपवासानंतर अल्लाहकडून निरंतर सुख मागणाच्या दिवशी म्हणजेच ईद उल फित्रच्या नमाजावरही शासनाने निर्बंध घातले असून यावेळी हे नमाज सार्वजनिकरित्या पढता येणार नाहीत.

हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharshtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२१०४१२२०३७४५२२९ असा आहे.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content