Homeचिट चॅटभविष्य अक्षय ऊर्जेचेच!

भविष्य अक्षय ऊर्जेचेच!

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी– इरेडा (IREDA) ने जर्मनीतील म्युनिच इथे झालेल्या ‘इंटरसोलर युरोप 2023’ ह्या  तीन दिवसीय प्रदर्शनात  सहभाग घेतला. 14 ते 16 जून 2023 ह्या काळात हे प्रदर्शन झाले. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, इरडा ही मिनी रत्न श्रेणीतील, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना असून, ह्या प्रदर्शनात त्यांनी एक पॅव्हेलियन स्थापन करुन आपल्या संघटनेबद्दल, प्रदर्शनात येणाऱ्या लोकांना माहिती दिली अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे, ऊर्जा क्षमतेला प्रोत्साहन देणे आणि भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या वृद्धीला पाठबळ देणे, अशा कामात इरडाच्या भूमिकेची माहिती प्रदर्शनाला येणाऱ्या लोकांना झाली. इरडाचे नेटवर्क वाढवणे आणि इरडासोबत व्यवसायाच्या संभाव्य संधी शोधण्यासाठी देखील हे पॅव्हेलियन एक मंच म्हणून उपयुक्त ठरले. विशेषतः आज जेव्हा ऊर्जा संक्रमणासाठीचा महत्वाचा काळ असून इरडा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ काढण्याच्या विचारात असतांना, ह्या प्रदर्शनातला सहभाग विशेष महत्वाचा ठरला.

इरडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, प्रदीप कुमार दास यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, “इंटरसोलर युरोप मुळे इरडा ला आपल्या उपलब्धी आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वित्तपुरवठ्याचा अनुभव दाखवण्याची संधी मिळते आहे. ह्या प्रतिष्ठित प्रदर्शनाचा भाग झाल्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. यामुळे आम्हाला जागतिक स्तरावरील भागीदारांशी चर्चा करण्याची आणि त्याद्वारे एकत्रित काम करण्याच्या, एकमेकांच्या कल्पनांची देवघेव करण्याची आणि ऊर्जा संक्रमणाच्या मोहिमेला गती देत, अधिक हरित आणि शाश्वत भविष्यकडे वाटचाल करण्याचीही संधी मिळाली.

इंटरसोलर युरोप 2023 मध्ये इरडाचा सहभाग, जागतिक अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात, सहभाग देण्याची या कंपनीची कटिबद्धता आणि शाश्वत विकासाच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याची मानसिकता दिसून आली. ह्या सहकार्याच्या प्रयत्नातून तसेच, अभिनव उपाययोजना करत, भारताच्या अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यात आणि हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यात, इरडा आपले महत्वाचे योगदान देतच राहणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content